Amaran OTT Release: अभिनेत्री साई पल्लवी 'अमरन' चित्रपट चांगलाच गाजला. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 31 ऑक्टोबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. 'अमरन' ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळला. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर कधी स्ट्रीम होईल, याची अनेकजण वाट पाहत आहेत. आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
'अमरन' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. चाहत्यांना हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. 'अमरन' सिनेमात साई पल्लवीसोबत अभिनेता शिवकार्तिकेयन झळकला आहे. यंदाच्या सर्वोत्तम तमिळ चित्रपटांपैकी एक म्हणून या सिनेमाचं कौतुक होतंय.
'अमरन' या चित्रपटात एका लष्करी अधिकाऱ्याचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. मेजर मुकुंद वरदराजन यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. मेजर मुकुंद वरदराजन यांनी दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान देशासाठी बलिदान दिलं होतं. 'अमरन'ची कथा शिव अरूर आणि राहुल सिंह यांच्या 'इंडियाज मोस्ट फिअरलेस: ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिटरी हिरोज' या पुस्तकाच्या आधारावर रुपेरी पडद्यावर 'अमरन' साकारण्यात आला आहे.