Join us  

बॅकग्राउंडर डान्सर ते साऊथची टॉपची हिरोईन; फोटोमधील चिमुकलीला ओळखलंत का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 3:56 PM

सध्या सोशल मीडियावर सिनेजगतातील कलाकारांच्या बालपणीचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

Kajal Aggarwal : सध्या सोशल मीडियावर सिनेजगतातील कलाकारांच्या बालपणीचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. याच दरम्यान दक्षिणात्य सिनेसृष्टीतील एका अभिनेत्रीचे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत. 

साऊथ इंडस्ट्रीत आपल्या अदाकारिने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ घालणारी ही नायिका म्हणजे काजल अग्रवाल. अलिकडेच सोशल मीडियावर काजल अग्रवालचा बालपणीचा फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. पारंपरिक काश्मिरी पोशाखात अभिनेत्रीचं लहानपणीचं गोंडस रूप पाहायला मिळत आहे. 

२००४ मध्ये  आलेल्या 'क्यू हो गया' या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने अभिनेत्री ऐश्वर्या राय, विवेक ओबेरॉय तसेच अभिनेते अमिताभ बच्चन यांसारख्या बड्या कलाकरांसोबत स्क्रिन शेअर केली. पण, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारसा काही चालला नाही. बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीला पाहिजे तसा स्टारडम मिळाला नाही. त्यानंतर काजल अग्रवालने हिंदी सिनेसृष्टीकडे पाठ फिरवली. तिने दक्षिणात्य कलाविश्वात आपलं नशीब आजमावण्याचं ठरवलं. 

 सिने-प्रवास:

अभिनेत्री काजल अग्रवालचा जन्म १९ जून १९८५ मध्ये मुंबईतील एका पंजाबी कुटुंबात झाला. एक बॅकग्राउंडर डान्सर म्हणून काम करत तिने आपल्या करिअरची सुरूवात केली. खरं सांगायचं झालं तर अगदी लहानपणापासूनच काजलला टीव्हीवर झळकण्याची मनोमन इच्छा होती. पण, एक अभिनेत्री नव्हे तर एक पत्रकार म्हणून तिला टीव्हीवर यायचं होतं. पण त्याऐवजी ही पंजाबी मुलगी सिनेजगतातली आघाडीची नायिका बनली.

मगधीरामुळे नशीबच पालटलं-

अभिनेत्री काजल अग्रावालला बॉलिवूडमध्ये  पाहिजे तसा स्टारडम मिळाला नाही. 'सिंघम' या चित्रपटामध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. अभिनेता अजय देवगनसोबत तिने पहिल्यांदा स्क्रिन शेअर केली. या चित्रपटानेही त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 

'लक्ष्मी नारायण' या  मुव्हीद्वारे तिने साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. परंतु 'चंदा मामा' या सिनेमाने तिला खरी ओळख मिळवून दिली. सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या 'मगधीरा' या चित्रपटामुळे अभिनेत्रीला रातोरात प्रसिद्धी मिळाली. साऊथ स्टार राम चरणसह काजल अग्रवालचं नशीबही या चित्रपटामुळे पालटलं.  या फिल्मने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. आपल्या सिने कारकिर्दीत काजलने जवळपास ५०हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

सध्या अभिनेत्री तिच्या वैवाहिक जीवनात व्यस्त आहे. २०२० मध्ये तिने गौतम किचलुसोबत लग्न केलं. आता अ‍ॅक्ट्रेस एका गोंडस मुलाची आई आहे. 

टॅग्स :काजल अग्रवालसेलिब्रिटीप्रेरणादायक गोष्टी