सेलिब्रिटी आणि कलाकारांना अभिनयासोबतच त्यांच्या फिटनेसकडेही लक्ष देणं गरजेचं असतं. ते नेहमीच फिट राहण्याचा प्रयत्न करतात. तर काही वेळेस भूमिकांसाठी कलाकारांना त्यांचं वजन घटवावं लागतं. अनेक कलाकार त्यांची ट्रान्सफॉर्मेशन जर्नीही शेअर करतात. एका साऊथ अभिनेत्रीने दोन आठवड्यांत तब्बल ८ किलो वजन कमी केलं होतं. मुलाखतीत तिने तिचा डाएट प्लॅन सांगितला होता.
साऊथ अभिनेत्री मालविका मोहनने १५ दिवसांत ८ किलो वजन कमी केलं होतं. एका भूमिकेसाठी अभिनेत्रीला तिचं वजन कमी करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे तिने झपाट्याने वजन कमी केलं होतं. पण, यासाठी मालविकाला खूप विचित्र डाएट प्लॅन देण्यात आला होता. अभिनेत्रीने तो फॉलोही केला. पण, चाहत्यांना तिने असा डाएट प्लॅन न करण्याचा सल्ला दिला आहे.
मालविका म्हणाली, "एका भूमिकेसाठी मला फॅट पर्सेंट कमी करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे मी खूपच कमी कार्ब डाएट घेतलं होतं. मी सिनेमात स्टंट सीन्स करत होते. जेवढं मी खात होते त्यापेक्षा जास्त एनर्जी मला स्टंट करताना लागत होती. दिवसातून तीन वेळा खायचे पण खूपच कमी असायचं. मी क्रॅश डाएट फॉलो केलं होतं. दोन आठवड्यांत मी ८ किलो वजन कमी केलं होतं. पूर्ण दिवसात मी फक्त एक सफरचंद आणि एक एग व्हाइट खायचे. त्याव्यतिरिक्त मी काहीही खात नव्हते. आम्हा कलाकारांना असे डाएट फॉलो करावे लागतात. मात्र हे बरोबर नाही".