Join us  

'बर्बाद कर दिया तेरे प्यार...' प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट यांंच्यावर अभिनेत्रीचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 12:48 PM

भट कॅम्पवर पुन्हा एकदा गंभीर आरोप, 'या' अभिनेत्रीने केली जाहीर तक्रार

बॉलिवूडमध्ये भट कॅम्प गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहेत. महेश भट, विक्रम भट यांचा बॉलिवूडमध्ये दबदबा आहे. दरम्यान त्यांच्याबद्दल नेहमीच काही ना काही कॉन्ट्रोव्हर्सीही झाली आहे. अनेकदा त्यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. तर काही फोटोशूटवरुनही वाद झाला आहे. 'गँगस्टर', 'जिस्म','मर्डर', 'जन्नत' असे अनेक चित्रपट भट कॅम्पने दिले आहेत. बोल्ड सीन्स ही त्यांच्या सिनेमांची खासियतच आहे. आता पुन्हा एकदा विक्रम भट (Vikram Bhat)यांचं नाव चर्चेत आलं आहे. 

तेलुगू, तमिळ आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री मालवी मल्होत्राने (Malvi Malhotra)  विक्रम भट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 2017 साली मालवीने 'उडान' या टीव्ही मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली. मानवीचा आरोप आहे की विक्रम भट यांनी तिच्याकडून म्युझिक व्हिडिओत काम करुन घेतले मात्र त्याचं मानधन अद्याप दिलं नाही. मालवीने विक्रम भट यांच्या 'बर्बाद कर दिया तेरे प्यार ने' या म्युझिक व्हिडिओत काम केले होते. याचं दिग्दर्शन विक्रम भट यांची मुलही कृष्णा भटने केलं होतं. यानंतर मानवीने जेव्हा मानधनासाठी फोन केला तेव्हा तिला कोणीच उत्तर दिलं नाही. अखेर सोमवारी तिने याबाबत जाहीरपणे वाच्यता केली. ती म्हणाली, "मी गेल्या वर्षी विक्रम भट यांच्या प्रोडक्शनमध्ये काम केलं होतं. तेव्हा मी साऊथच्या एका सिनेमात व्यस्त होते मात्र भट कॅम्पचं मोठं नाव असल्याने मी त्यांच्या म्युझिक व्हिडिओला होकार दिला. मी व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत काम केले. त्यांच्यावर विश्वास ठेवला."

ती पुढे म्हणाली, "शूटनंतर मी त्यांना माझ्या मानधनासाठी पावती पाठवली. मात्र त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. जेव्हा वीनस प्रोडक्शनच्या कंपनीने माझ्याशी संपर्क केला चेव्हा ते म्हणाले की ते गाणं रिलीज करत आहेत. मी प्रमोशन करावं अशी त्यांची इच्छा आहे. तेव्हा मी त्यांना मानधनाविषयी विचारलं तर तेव्हाही मला उत्तर आलं नाही. काही महिन्यांनंतर विक्रम भट यांनी त्यांच्या एका फिल्मसाठी मला ऑफर दिली पण मी ते टाळलं. एक कलाकार म्हणून  सम्मान आणि मानधनाची आपल्याला गरज असते. आम्ही इतकी मेहनत घेतो त्यामुळे आम्हाला अधिकार आहे. कोणा दुसऱ्या कलाकाराला असा अनुभव येऊ नये म्हणून मी हे सगळं सांगत आहे."मालवीच्या आरोपांनंतर कृष्णा भटने उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, "मला याबद्दल काहीच कल्पना नाही. हा पण एक वीनस व्हिडिओ आहे. मालवी जे सांगतेय त्याविषयी मला माहित नाही. म्हणून मी या आरोपांवर आताच काही बोलू शकत नाही."

वर्कफ्रंट 

मालवी मल्होत्राने 2018 साली हिंदी सिनेमा 'होटल मिलान' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर 'जोरावर दी जॅकलीन','अभ्युहम' सारखे सिनेमे केले. शिवाय 'सोहनी मुटियार','ढोल वाजदा','शाइनिंग स्टार','कारोबार','डान्स सोनिए' सारख्या म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. 

टॅग्स :विक्रम भटसेलिब्रिटीसोशल मीडियासिनेमाबॉलिवूड