Join us
Daily Top 2Weekly Top 5

"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 16:14 IST

एका साऊथ अभिनेत्रीला सिनेमाच्या सेटवर धक्कादायक अनुभव आला. सेटवर बहीण मानणाऱ्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. 

सिनेइंडस्ट्रीत अभिनेत्रींना अनेकदा कास्टिंग काऊचला सामोरं जावं लागलं आहे. अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेले कास्टिंग काऊचचे अनुभवही सांगितले आहेत. सिनेमात काम देतो असं सांगून अभिनेत्रींकडे शरीरसुखाची मागणी केली जाते. केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर साऊथ इंडस्ट्रीमध्येही हे प्रकार घडतात. एका साऊथ अभिनेत्रीला सिनेमाच्या सेटवर धक्कादायक अनुभव आला. सेटवर बहीण मानणाऱ्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. 

साऊथ अभिनेत्री चार्मिला क्रिस्टीनासोबत सिनेमाच्या शुटिंगदरम्यान धक्कादायक प्रकार घडला होता. ४८ वर्षीय चार्मिलाने सांगितलं की ती मल्याळम सिनेमाचं शूटिंग करत होती आणि त्या सिनेमात ती आईची भूमिका साकारत होती. सिनेमाचा निर्माता अभिनेत्रीपेक्षा लहान होता. तो सेटवर चार्मिलाला दीदी म्हणून हाक मारायचा. पण, नंतर त्याने पैशाच्या बदल्यात अभिनेत्रीसोबत कास्टिंग काऊच करण्याचा प्रयत्न केला. 

मुलाच्या वयाच्या असलेल्या निर्मात्याने शरीरसुखाची मागणी केल्यानंतर चार्मिला यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अभिनेत्रीच्या असिस्टंटशी बोलून निर्मात्याने ही ऑफर दिली होती. ५० हजार रुपये दिले जातील. याबदल्यात त्यांना दोघांपैकी एकासोबत शरीरसंबंध ठेवावे लागतील, असं सांगण्यात आलं होतं. चार्मिला यांनी त्या दोघांनाही समजावलं की ते दोघेही त्यांच्या मुलाच्या वयाचे आहेत. त्या त्यांच्या आईसमान आहेत. पण, त्यांनी अभिनेत्रीचं म्हणणं ऐकलं नाही. त्यानंतर चार्मिला शूटिंग सोडून त्यांच्या घरी चेन्नईला निघून आल्या.  

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी