Join us
Daily Top 2Weekly Top 5

सूनबाई पोहोचल्या लंडनला

By admin | Updated: March 28, 2016 00:21 IST

महाराष्ट्राची लाडकी सून तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. काही महिन्यांपूर्वीच तेजश्रीची ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका नुकतीच

महाराष्ट्राची लाडकी सून तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. काही महिन्यांपूर्वीच तेजश्रीची ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका नुकतीच संपली आहे. यानंतर तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे, की तेजश्रीचे सध्या काय चालले आहे? या विचारात असाल तर ऐका... चाहत्यांनो, तुमची ही लाडकी सून सध्या लंडनमध्ये हॅपी हॅपी दिसत आहे. तिने सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. जीन्स, टॉप, ब्लॅक शूज यामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलले आहे. तसेच तिने केलेल्या ट्विटमधून असे कळते, की तेजश्री सध्या ‘कार्टी घुसली काळजात’ या नाटकाच्या प्रयोगासाठी लंडनमध्ये पोहोचली आहे.