Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनू बनला ‘पूजा साहित्य विक्रेता’

By admin | Updated: October 26, 2015 00:18 IST

वेळ सायंकाळी ६ वाजताची... अचानक ओंकारेश्वर मंदिराच्या बाहेर व्हाईट टीशर्ट आणि जीन्समध्ये एक गायक-अभिनेता पूजा साहित्याची विक्री करताना दिसला

वेळ सायंकाळी ६ वाजताची... अचानक ओंकारेश्वर मंदिराच्या बाहेर व्हाईट टीशर्ट आणि जीन्समध्ये एक गायक-अभिनेता पूजा साहित्याची विक्री करताना दिसला. पहिल्यांदा पुणेकरांना हे शूटिंग आहे असे वाटले, त्यामुळे बघ्यांची तिथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. चक्क पुणेकर त्याच्याकडून साहित्याची खरेदीदेखील करीत होते. एखादा गायक किंवा सेलिब्रिटी असे रस्त्यावर उभे राहून विक्री करणे तशी दुर्मिळच गोष्ट, पण त्याला सामाजिकतेची जोड असेल, तर त्याच्यामधील ‘माणूस’देखील जागा होतो, हेच याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. स्मृती शिंदे सोबो फिल्म्सद्वारे निर्मित ‘मिशन सपने’चा दुसरा सिझन येत आहे. या शोमध्ये वेगवेगळ्या जीवनशैलीतील सेलीब्रिटीजना एकत्र आणण्यात येत असून, ते सामान्य माणसाच्या भूमिकेत शिरून रोजचे काम करणार आहेत. या चित्रीकरणाला नुकताच पुण्यात उत्साहात प्रारंभ झाला. एका ३५ वर्षांच्या राजू खिराडे या एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीची मदत करून, सोनू निगमने एचआयव्हीबद्दल जागरूकता निर्माण केली. या विक्रीतून तो जेवढा पैसा कमवेल, तो निधी वाढवून राजू खिराडेला आर्थिक समस्या सोडविण्यासाठी दिला जाणार आहे.