Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनालीचा फर्स्ट सेल्फी

By admin | Updated: March 27, 2016 01:46 IST

अप्सरा आली या गाण्यातील दिलखेच अदांनी तमाम तरुणांच्या काळजाचा ठोका चुकविणारी आपली ब्युटिफुल गर्ल सोनाली कुलकर्णी तिच्या नव्या मोबाइलमधील फर्स्ट

अप्सरा आली या गाण्यातील दिलखेच अदांनी तमाम तरुणांच्या काळजाचा ठोका चुकविणारी आपली ब्युटिफुल गर्ल सोनाली कुलकर्णी तिच्या नव्या मोबाइलमधील फर्स्ट सेल्फीचा फोटो सध्या सोशल साईटवर शेअर करीत आहे. सेल्फी काढण्याची झिंग अन् क्रेझ सध्या सगळीकडेच पाहायला मिळते. काही नवीन गोष्ट घेतली, कुठे फिरायला गेलो आणि स्पेशल मोमेंट्स सेल्फीच्या रूपात कायम बंदिस्त करून आठवणींच्या कोपऱ्यात जपून ठेवाव्यात असे सर्वांनाच वाटते. मग आपली पोश्टर गर्ल तरी कशी काय मागे राहील? सोनालीने नव्या फोनमधील एक झक्कास सेल्फी काढून तो पोस्ट केला आहे. डार्क नेवी ब्ल्यु कलरच्या ड्रेसमध्ये सोनालीचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. तिच्या या सेल्फीवर तिचे चाहते घायाळ झाले नाही तरच नवल!