Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सुशीला-सुजीत'मधील 'नॉटी नॉटी' गाणं प्रदर्शित, रोमँटिक झाले सोनाली आणि स्वप्निल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 18:27 IST

'सुशीला सुजीत' या सिनेमातील 'नॉटी नॉटी' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात सोनाली आणि स्वप्नीलचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

सोनाली कुलकर्णी आणि स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असलेला 'सुशीला सुजीत' हा मराठी सिनेमा १८ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. प्रसाद ओकने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. एक आगळी-वेगळी कथा असलेल्या या सिनेमाची टीझरपासून चाहत्यांना उत्सुकता होती. या सिनेमातील ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या सिनेमातील सुशीला-सुजीतचं रोमँटिक गाणं प्रदर्शित झालं आहे.

'सुशीला सुजीत' या सिनेमातील 'नॉटी नॉटी' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात सोनाली आणि स्वप्नीलचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. पॅनोरमा म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवरुन हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'सुशीला सुजीत' सिनेमातील चिऊताई चिऊताई दार उघड आणि मराठी रॅप साँगप्रमाणेच या गाण्यालाही पसंती मिळत आहे. या गाण्यातील सोनाली कुलकर्णी आणि स्वप्नील जोशी यांची केमिस्ट्रीही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. 

'सुशीला सुजीत' सिनेमाच्या निमित्ताने स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. या सिनेमात सुनील तावडे, नम्रता संभेराव, रीलस्टार अथर्व सुदामे, रेणुका दफ्तरदार, राधा सागर, राजेंद्र शिसाटकर, अजय कांबळे हे कलाकारही झळकले आहेत.

टॅग्स :स्वप्निल जोशीसोनाली कुलकर्णीमराठी चित्रपट