न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पती गोल्डी बहलसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. शिवाय पतीसोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत. २००२ मध्ये सोनालीने गोल्डीसोबत लग्न केले.
कॅन्सर ही एकट्याने लढण्याची लढाई नाही. तुमचे संपूर्ण कुटुंब या वेदना भोगते. मी ही लढाई लढतेय, कारण गोल्डी माझ्यासोबत आहे, असे सोनालीने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
ती लिहिते, मी लिहितेय खरे पण मनातल्या सगळ्या भावना मला शब्दांत लिहिता येणार नाहीत. नवरा, सखा, बेस्ट फ्रेन्ड, माय रॉक़..माझ्यासाठी गोल्डी बहल हे सगळे आहे. लग्न म्हणजे,एकमेकांसोबत, एकमेकांसाठी उभे राहणे. कॅन्सर ही कुण्या एकट्या व्यक्तिने लढणारी लढाई नाही. संपूर्ण कुटुंबाला ही लढाई लढावी लागते. मी ही लढाई लढू शकतेय, करण मला माहित होते की,तू (गोल्डी बहल) सगळ्या जबाबदाºया सांभाळशील, काही जबाबदाºया स्वत:हून स्वीकारशील. माझी ताकद बनण्यासाठी, माझे प्रेम बनण्यासाठी,माझा आनंद बनण्यासाठी तुझे आभार. मी तुझ्याबद्दल काय सांगू, तू माझा भाग आहे, माझा आहेस, तुझ्याशिवाय मी काहीच नाही. हॅपी अॅनिव्हर्सरी गोल्डी...!
सोनालीने १२ नोव्हेंबर २००२ रोजी गोल्डीसोबत लग्न केले. गोल्डी एक निर्माता आहे. अंगारे, द्रोणा, यू मी आरै हम सारखे चित्रपट त्याने प्रोड्यूस केले आहेत. टीव्हीवरच्या अनेक मालिकांची निर्मितीही त्याने केली आहे. सोनाली व गोल्डीला १३ वर्षांचा एक मुलगा आहे.