Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाक्षीचे गायनाचे तेवर

By admin | Updated: November 15, 2014 00:34 IST

आलिया भट्ट, श्रद्धा कपूर यांनी त्यांच्या गायनाची मोहिनी प्रेक्षकांना घातली आहे. याच यादीत आता सोनाक्षीच्या नावाचाही समावेश होत आहे.

आलिया भट्ट, श्रद्धा कपूर यांनी त्यांच्या गायनाची मोहिनी प्रेक्षकांना घातली आहे. याच यादीत आता सोनाक्षीच्या नावाचाही समावेश होत आहे. सोनाक्षीने ‘तेवर’ या चित्रपटात गायनाची इच्छा पूर्ण करून घेतली आहे. याबाबत सोनाक्षी सांगते की, ‘चित्रपटांसाठी गाण्याची माझी खूप दिवसांपासून इच्छा होती; पण मला ती संधी मिळाली नाही. पाकिस्तानी गायक इमरान खान एक गाणो घेऊन माङयाकडे आला, हे गाणो खरंच खूप सुंदर आहे. इमरान गाण्यासाठी एका गायिकेच्या शोधात होता. तो सेटवर आला तेव्हाच मला त्याने सांगितले की, हे गाणो तुलाच गायचे आहे. हे ऐकून माझा तर विश्वासच बसला नाही. मीही संधी गमावली नाही, माझी इच्छा पूर्ण करून घेतली.’ तेवरनंतर सोनाक्षीचे अॅक्शन ज्ॉक्सन आणि लिंगा हे चित्रपट रिलीज होत आहेत. अॅक्शन ज्ॉक्सनमध्ये ती कॉमेडी करताना दिसेल, तर लिंगामध्ये एका पाचव्या दशकातील प्रेमिकेच्या भूमिकेत ती असेल.