Join us

सोनाक्षी सिन्हाच्या दबंग अवताराचा सगळीकडे बोलबाला, फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 20:33 IST

बॉलिवूडची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येते

बॉलिवूडची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येते. पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे आणि तेही सोशल मीडियावरील पोस्टमुळे. सोनाक्षी अ‍ॅमेझॉन प्राईमवरील एका वेब सीरीजमध्ये मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून तिच्या आगामी वेबसीरिजबद्दल सांगितले आहे. अद्याप या सीरिजचे नाव आणि रिलीज डेट समजू शकलेली नाही. मात्र सोनाक्षी या सीरिजमध्ये हटके अंदाजात दिसणार आहे हे नक्की.  या वेबसीरीजमध्ये सोनाक्षी खाकी वर्दीतील महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोनाक्षी या पोस्टमध्ये रेल्वे रुळाच्या पटरीवर उभी आहे. या फोटोमध्ये तिचा दमदार अंदाज पहायला मिळतो आहे.

तिने ही पोस्ट 'जागतिक महिला दिनाच्या दिवशी शेअर करत लिहिले की, महिला यशाचे शिखर कितीही उंच असूदे त्या तो पार करतातच. महिला आणखी काय काय साध्य करु शकतात याची जाणीव आपल्याला पदोपदी येते. हेच दाखवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

सोनाक्षी सिन्हासह या वेबसीरीजमध्ये अभिनेता विजय शर्मा , गुलशन देवया आणि सोहम शहा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या वेबसीरीजचे दिग्दर्शन रिमा कागती आणि रुचिका अग्रवाल यांनी केले आहे. 

सोनाक्षीने दबंग सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१९मध्ये सोनाक्षीने चार सिनेमे केलेत. यातील ‘दबंग3’ वर्षाच्या शेवटला रिलीज झाला. 2019 मध्ये सोनाक्षीने कलंक, खानदानी शफाखाना आणि मिशन मंगल, दबंग ३ असे चार सिनेमा रिलीज झाले.

सोनाक्षीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर ती अजय देवगणच्या 'भूज द प्राइड ऑफ इंडिया' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमादेखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हा