Join us
Daily Top 2Weekly Top 5

दबंगबाबत सोनाक्षी सिन्हाने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 15:49 IST

सलमान खानचा 'दबंग 3' सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला पुन्हा एकदा येतोय. गेल्या अनेक दिवसांपासून हा सिनेमा कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे.

ठळक मुद्दे भारत सिनेमाची शूटिंगनंतर सलमान 'दबंग 3'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

सलमान खानचा 'दबंग 3' सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला पुन्हा एकदा येतोय. गेल्या अनेक दिवसांपासून हा सिनेमा कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. सलमान खानचे नाव तर यात कन्फर्म आहे मात्र सलमानच्या अपोझिट अभिनेत्री कोण असणार याबाबतचा खुसाला अद्याप झाला नव्हता. दबंगच्या याआधीच्या सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा होती मात्र या सीरिजमध्ये ती दिसणार नसल्याची चर्चा होती. सोनाक्षीने खुद्द याबाबतचा खुलासा केला आहे. सोनाक्षी म्हणाली दबंग 3 मध्ये ही तिची भूमिका असणार आहे. 

डीएनएच्या रिपोर्टनुसार, सोनाक्षी म्हणाली, या वर्षीच्या अखेरिस आम्ही 'दबंग 3' ला घेऊन येऊ. मी या सिनेमाचा हिस्सा बनून खुश आहे. भूमिकेबाबत बोलायचे झाले तर यातील माझी भूमिका खूप वेगळी आहे. हा सिनेमा माझ्यासाठी नेहमीच खास राहिला आहे. यावेळीची गोष्ट आणि मजेदार आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारत सिनेमाची शूटिंग संपल्यानंतर सलमान 'दबंग 3'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 

या सिनेमाच्या सीक्वलचे दिग्दर्शन प्रभूदेवा करणार आहे. याआधी दबंगचे दिग्दर्शन अभिनव कश्यपने केले होते. 'दबंग 2' चे दिग्दर्शन अरबाज खानने केले होते. यासिनेमातही चुलबुल पांडेची स्टोरी असणार आहे. या सिनेमाचे शूटिंग दिल्ली आणि उत्तर भारतातल्या शहरांमध्ये होणार आहे. सोनाक्षीचा 24 तारखेला 'हॅप्पी फिर भाग जाएगी' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.‘हॅपी फिर भाग जाएगी’चे दिग्दर्शक मुदस्सर अजीजने केलेय. सोनाक्षी हरप्रीतची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि ती चीनमध्ये पळून जाताना दिसणार आहे.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हासलमान खान