Join us

सिंघम म्हणजे सुपर हीरो : अजय

By admin | Updated: August 13, 2014 23:01 IST

सिंघम रिटर्न्स’ चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावणाऱ्या अजय देवगणच्या मते या चित्रपटातील त्याचे बाजीराव सिंघम हे पात्र एखाद्या सुपर हीरोपेक्षा कमी नाही.

‘सिंघम रिटर्न्स’ चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावणाऱ्या अजय देवगणच्या मते या चित्रपटातील त्याचे बाजीराव सिंघम हे पात्र एखाद्या सुपर हीरोपेक्षा कमी नाही. एका मुलाखतीत अजय म्हणाला की, ‘सिंघम सुपर हीरो आहे. आपली संस्कृती अशी आहे की, सुपर हीरो बनण्यासाठी फारशी मेहनत करावी लागत नाही. बाजीराव एक व्यापक व्यक्तिमत्त्व आहे. सिंघम इतर स्पायडरमॅन किंवा सुपरमॅनसारख्या सुपर हीरोंप्रमाणेच वाईटाशी लढा देतो.’ अजयच्या मते सिंघम त्या सुपर हीरोंपेक्षा जास्त वास्तविक आहे. सिक्वलमध्ये तर आव्हान मोठे आहे. सिंघम सिरीजचा पहिला चित्रपट २०११ मध्ये रिलीज झाला. सिक्वलमध्ये चित्रपटात बाजीराव सिंघमचे पात्र सोडले तर सर्वच नवे आहेत. सिंघम रिटर्न्सचे दिग्दर्शनही रोहित शेट्टीने केले असून चित्रपटात अजयसोबत करिना कपूर मुख्य भूमिकेत आहे.