Join us
Daily Top 2Weekly Top 5

जुबिन नौटियाल पत्रकार बनून थेट पोहोचला  ‘करोडपती’ हिमानीच्या घरी...; पुढं काय झालं पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 16:50 IST

जुबिनने हिमानीच्या बहिणीसोबत मिळून सरप्राईज प्लान केलं.  एक पत्रकार म्हणून तो हिमानीच्या त्यांच्या घरी गेला आणि...

ठळक मुद्देहिमानीला भेटल्यावर जुबिनही चांगलाच इंम्प्रेस झाला.

कौन बनेगा करोडपती’च्या 13 व्या ( Kaun Banega Crorepati 13) सीझनची पहिली करोडपती हिमानी बुंदेला (Himani Bundela) हिला अलीकडे एक मोठं सरप्राईज मिळालं. अमिताभ बच्चन यांच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन 1 कोटी जिंकणारी हिमानी नेत्रहिन आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे राहणा-या याच हिमानीची एक इच्छा नुकतीच पूर्ण झाली. होय,  सिंगर जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) हा हिमानीचा सर्वाधिक आवडता गायक. जुबिनला भेटण्याची इच्छा हिमानीने अमिताभ यांच्याशी बोलताना व्यक्त केली होती.  बिग बींनी हिमानीचं शो दरम्यान जुबिनशी बोलणं करून दिलं होतं. त्यावेळी जुबिननं हिमानीला भेटायला नक्कीच आवडेल असंही सांगितलं होतं. हिमानीला दिलेलं हे वचन जुबिननं खरोखर पाळलं.  

शोनंतर हिमानीनं जुबिनला एक व्हॉईस मॅसेज पाठवला होता. हा व्हाईस मॅसेज ऐकून जुबिन इतका प्रभावित झाला की, त्याने तिला भेटण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर जुबिन आपलं वचन पूर्ण करण्यासाठी हिमानीच्या घरी पोहोचला. जुबिनने हिमानीच्या बहिणीसोबत मिळून हे सरप्राईज प्लान केलं.  एक पत्रकार म्हणून तो हिमानीच्या त्यांच्या घरी गेला आणि हिमानीशी बोलला.यावेळीही हिमानीनं जुबिनला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मग काय, तर पत्रकार बनून आलेला जुबिननं अचानक गाणं सुरू केलं. तेव्हा कुठं, आपली मुलाखत घेत असलेला जुबिन आपल्या समोर बसला असल्याचं हिमानीच्या लक्षात आलं.   

हिमानीला भेटल्यावर जुबिनही चांगलाच इंम्प्रेस झाला. हिमानीनं मला व्हॉईस नोट पाठवली तेव्हा मी खूप प्रभावित झालो. हिमानी आणि तिच्या कुटुंबाकडून मला खूप प्रेम मिळालं आणि सर्वांना भेटून मला खूप आनंद झाला. ती खरोखर खूप हुशार आहे आणि तिला भेटून तिच्याइतकाच मी सुद्धा आनंदी आहे, असं त्यानं सांगितलं.

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीटेलिव्हिजन