Join us
Daily Top 2Weekly Top 5

अदनान सामी पाकिस्तान सोडून भारतात का स्थायिक झाला? अखेर सांगितलं खरं कारण, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 10:49 IST

भारतात स्थलांतरित होण्याच्या 'त्या' निर्णयावर पहिल्यांदाच व्यक्त झाला अदनान सामी; कारण सांगत म्हणाला...

Adnan Sami: बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायक, संगीतकार अदनान सामीने (Adnan Sami) आपल्या समुधुर गायिकीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. लिफ्ट करा दे आणि कभी तो नजर मिलाओ, तेरा चेहरा असे हिट अल्बम त्याने केले आहेत. मूळचा पाकिस्तानचा असणारा हा गायक २००१ मध्ये भारतात स्थलांतरित झाला आणि २०१६ मध्ये त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं. अशातच आता दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी भारतात स्थलांतरित होण्याचं कारण पहिल्यांदाच सांगितलं आहे. 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अदनान सामीने त्याच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. त्यावेळी मुलाखतीत त्याने म्हटलं, "१९९८ मध्ये जेव्हा मी काही गाणी रिलीज केली तेव्हा पाकिस्तानमधील संगीत क्षेत्रातील लोकांना असं वाटत होतं की माझं करिअर संपलं आहे. 'त्यामुळे त्यांनी अल्बमच्या प्रमोशनसाठी फारशी मदत केली नाही. तेव्हा मार्केटिंग नव्हतं, काहीही नव्हतं. माझे अल्बम रिलीज झाले आणि कोणालाही कळलंही नाही. त्यामुळे खूप नुकसान झालं. मला माहित होतं की त्यांनी हे जाणूनबुजून केलं होतं. त्याचं मला खूप वाईट वाटलं."

त्यानंतर अदनान सामीने आशा भोसले यांच्यासोबत १९९७ च्या 'बदलते मौसम' अल्बमसाठी त्यांनी 'कभी तो नजर मिलाओ' हे गाणं गायलं होतं त्या भेटीचा एक किस्सा त्यांनी सांगितला. तेव्हा अदनान सामी म्हणाला, "मी आशाजींना सांगितलं की, पाकिस्तानातील काही लोकांनी माझ्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं कारण मला माहित नाही. त्यामुळे आपण लंडनमध्ये एकत्र रेकॉर्डिंग करू शकतो का? कारण तिथे काही जणांसोबत माझी ओळख आहे."

प्रसिद्ध गायिकेने दिलेला 'तो' सल्ला...

त्यावर आशा भोसलेंनी मला सल्ला दिला, त्या म्हणाल्या, "तुला जर खरोखरच काही चांगलं करायची इच्छा असेल तर मुंबईत का येत नाहीस. मुंबई ही हिंदी संगीताची राजधानी आहे. एकदा इथे आल्यावर, जो कोणी लोकप्रिय होतो तो जगभरात प्रसिद्ध होतो."असा सल्ला त्यांनी मला दिला आणि त्याच्या त्या सल्ल्याने माझं नशीब पालटलं." असा खुलासा त्याने केला. 

टॅग्स :अदनान सामीबॉलिवूडसेलिब्रिटी