Join us

सैयामी खेरने केले हॉट फोटोशूट!

By admin | Updated: May 28, 2017 02:02 IST

‘मिर्जिया’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या सैयामी खेर हिचे लेटेस्ट फोटोशूट समोर आले आहेत. स्विमसूटसाठी केलेल्या या फोटोशूटमध्ये सैयामी खूपच सुंदर दिसत

‘मिर्जिया’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या सैयामी खेर हिचे लेटेस्ट फोटोशूट समोर आले आहेत. स्विमसूटसाठी केलेल्या या फोटोशूटमध्ये सैयामी खूपच सुंदर दिसत असून फोटोंमधील तिचा अंदाज बघण्यासारखा आहे. या फोटोंचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व फोटो ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ असल्याने त्यामध्ये सैयामी खूपच गॉर्जियस दिसत आहे. एका फोटोमध्ये ती गॉगल घालून दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत ती स्विमपूलमध्ये बघावयास मिळत आहे. इतरही फोटोंमध्ये सैयामी ग्लॅमरस लुकमध्ये बघावयास मिळत आहे. सैयामीने हे फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले असून, त्यास तिच्या चाहत्यांकडून प्रचंड पसंती मिळत आहे. त्याचबरोबर सध्या सैयामीचे हे फोटो सर्वत्र व्हायरलही झाले आहेत. सैयामीने मॉडेलिंग क्षेत्रातून ग्लॅमरच्या दुनियेत पाऊल ठेवले होते. किंगफिशर कॅलेंडरची ती मॉडेल राहिली आहे. सध्या ती मॉडेलिंगवरच फोकस करून असल्याचे समजते.