Join us
Daily Top 2Weekly Top 5

'येऊ कशी तशी मी नांदायला'मधून शुभांगी गोखले पडल्या बाहेर, आता शकू मावशीच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 17:35 IST

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतील सर्वांची लाडकी शकू मावशी मालिका सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'येऊ कशी तशी मी नांदायला'ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील स्वीटू आणि ओमची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या दोघांची प्रेमकहाणी देखील प्रेक्षकांना खूप आवडते. यासोबतच या मालिकेतील इतर पात्रांनी देखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. सध्या मालिका कथानकात आलेल्या ट्वीस्टमुळे ट्रोल होत आहे. अशातच आता या मालिकेतील सर्वांची लाडकी शकू मावशी मालिका सोडणार असल्याची चर्चा रंगलेली आहे. त्यांच्या जागेवर मात्र सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील एक लोकप्रिय चेहरा दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लवकरच या मालिकेत शकू मावशीच्या भूमिकेत सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील अंजीची आई म्हणजे अभिनेत्री किशोरी अंबीये दिसणार आहेत. सोशल मीडियावर देखील याची चर्चा रंगलेली आहे. नेटकऱ्यांनी देखील या भूमिकेला शुभांगी गोखलेचे योग्य असल्याचे म्हटले आहे. मात्र यावर अधिकृतपणे शुभांगी गोखले असतील किंवा किशोरी अंबीये यांच्याकडून कोणतेच अधिकृत स्टेटमेंट आलेले नाही. यासोबतच येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या टीमकडून याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

यासोबतच झी मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये शुभांगी गोखले दिसत नाहीत तर त्यांच्या लबकमध्ये किशोरी अंबीये  दिसत आहेत. तर याच व्हिडीओच्या सुरूवातीला शुभांगी गोखले यांच्यासोबतच मालिकेचे पोस्टर दाखवण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

टॅग्स :झी मराठी