Join us

श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवाल झळकणार 'द इंडिया स्टोरी'मध्ये, शूटिंगला केली सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:20 IST

Shreyas Talpade :अलिकडेच श्रेयसने त्याच्या आगामी 'द इंडिया स्टोरी' (The India Story) या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. चित्रपटाच्या मुहूर्ताचा फोटो त्याने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) लवकरच कंगना राणौत(Kangana Ranaut)च्या 'इमर्जन्सी' (Emergency Movie) चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाशिवाय तो त्याच्या पुढच्या चित्रपटाबाबतही चर्चेत आहे. अलिकडेच श्रेयसने त्याच्या आगामी 'द इंडिया स्टोरी' (The India Story) या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. चित्रपटाच्या मुहूर्ताचा फोटो त्याने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 

'द इंडिया स्टोरी' चित्रपटाची कथा देशात घडलेल्या मोठ्या आणि वादग्रस्त घोटाळ्यांवर आधारित असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत असून, त्याच्यासोबत काजल अग्रवालही या चित्रपटात दिसणार आहे. काजलने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त साऊथ चित्रपटांमध्येही अनेक उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाशी संबंधित माहिती देण्यासोबत, श्रेयसने इंस्टाग्राम कॅप्शनमध्ये लिहिले की, ही इतकी छान कथा आहे, जी याआधी कधीही सांगितली गेली नाही. 'द इंडिया स्टोरी' हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार‘द इंडिया स्टोरी’ हा चित्रपट एमआयजी प्रॉडक्शन आणि स्टुडिओच्या सागर बी शिंदे यांनी लिहिला आणि निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन डीके करत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग कोल्हापुरात होणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

इमरजन्सी सिनेमात श्रेयसने साकारली ही भूमिकाकंगना राणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये श्रेयस तळपदेने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. अटलजींची भूमिका साकारताना तो खूप आनंदी आहे. चित्रपटाचा ट्रेलर, टीझर आणि पोस्टरमध्येही श्रेयसचा लूक चांगला दिसत आहे. कंगना राणौतसोबत चित्रपटात काम करण्याचा अनुभवही अभिनेत्यासाठी संस्मरणीय आहे. या चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट १७ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.

टॅग्स :श्रेयस तळपदेकाजल अग्रवाल