Join us  

श्रद्धा कपूरचा बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत डान्स, अंबानींच्या पार्टीतील Inside Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 12:51 PM

पॉपस्टार रिहानाच्या गाण्यावर बॉयफ्रेंडसोबत एन्जॉय करतानाचा श्रद्धाचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor)  नेटकऱ्यांची खूप लाडकी आहे. आपल्या सोशल मीडियावरुन ती मजेशीर कंटेंट शेअर करत असते. तसंच चाहत्यांच्या कमेंट्सना उत्तरंही देत असते. सध्या श्रद्धा कपूर बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत लग्न करणार या चर्चांनाही उधाण आलंय. काही दिवसांपूर्वी अंबानींच्या पार्टीत ती राहुल मोदीसोबत पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसली. आता याच पार्टीत पॉपस्टार रिहानाच्या गाण्यावर बॉयफ्रेंडसोबत एन्जॉय करतानाचा तिचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरचा 'तू झुठी मै मक्कार' सिनेमा काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. राहुल मोदी या सिनेमाचा लेखक होता. सिनेमाच्या शेड्युलदरम्यानच त्यांची ओळख झाली. श्रद्धा आधी सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठाला डेट करत होती. मात्र नंतर त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली. आता श्रद्धा आणि राहुल मोदी एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग पार्टीत हॉलिवूड पॉपस्टार रिहानाचा परफॉर्मन्स होता. अख्खं बॉलिवूड या सोहळ्याला उपस्शित होतं. तेव्हा श्रद्धाही राहुलसोबत आली होती. दोघांनी कॅमेऱ्यासमोर एकत्र पोज दिली नसली तरी आता पार्टीतले व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये रिहानाचा परफॉर्मन्स सुरु असताना श्रद्धा आणि राहुल एन्जॉय करताना दिसत आहेत. Reddit साईटवर त्यांचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. 

Shraddha with her boyfriend at Rihanna's concert byu/divaista inBollyBlindsNGossip

काही दिवसांपूर्वी श्रद्धाने इन्स्टाग्रामवर एक सेल्फी पोस्ट केला होता. ती दर रविवारी चाहत्यांसोबत तिचे सेल्फी शेअर करत असते. या सेल्फीमध्ये तिच्या गळ्यात R नावाचं पेंडंट होतं. या फोटोनंतर श्रद्धाने प्रेमाची कबुली दिली अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र अद्याप दोघांनीही जाहीररित्या नातं स्वीकारलेलं नाही. 

श्रद्धा कपूर आगामी 'स्त्री 2' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये राजकुमार राव, पंकज त्रिपाठी यांच्याही भूमिका आहेत. हॉरर कॉमेडी 'स्त्री' सिनेमाचा हा सीक्वेल आहे. 

टॅग्स :श्रद्धा कपूरसोशल मीडियारिलेशनशिपबॉलिवूड