Shraddha Kapoor: अभिनेत्री श्रद्धा कपूर कायमच चर्चेत असते. आपला अभिनयाच्या जोरावर तिनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. अभिनयासोबतचं तिच्या प्रेमळ स्वभावामुळे तिचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्रीच्या प्रोफेशनल लाईफइतकीच किंबहुना तिच्यापेक्षा जास्त चर्चा तिच्या पर्सनल लाईफची होते. श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहतेही तिच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती एका लग्न समारंभाला उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं. या सोहळ्यातील आणखी काही फोटो समोर आले आहेत.
श्रद्धा कपूर मैत्रिणीच्या लग्नाला पोहचली होती. यावेळी मात्र ती एकटी नाही तर तिच्यासोबत रुमर्ड बॉयफ्रेंड राहुल मोदीदेखील पाहायला मिळाला. श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी एकत्र पोज देताना दिसले. श्रद्धा कपूर सोनेरी रंगाच्या पोशाखात खूपच सुंदर दिसत होती. श्रद्धा कपूरच्या इंस्टाग्रामवरील एका फॅन पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे
श्रद्धा कपूर आणि राहुल मोदींना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. आता पुन्हा एकदा दोघेही एका लग्न समारंभात एकत्र दिसल्यानं दोघेही गंभीर रिलेशनशीपमध्ये असल्याचं दिसून येत आहे. अंबानींच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये श्रद्धा त्याच्यासोबत दिसली होती.आता श्रद्धा तिचं हे नातं कधी अधिकृत करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती राजकुमार रावसोबत 'स्त्री २' या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसली होती. या हॉरर कॉमेडी सिनेमानं बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. 'स्त्री २' च्या यशामुळे श्रद्धाची डिमांडही वाढली आहे. तसंच अफेअरच्या चर्चांमुळेही ती सतत प्रसिद्धीझोतात असते. इतकंच नाही तर बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींपेक्षा श्रद्धाचे इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत. कमेंट्समध्ये ती चाहत्यांना अनेकदा रिप्लायही देते.