Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बाघी’ करताना श्रद्धा जखमी

By admin | Updated: February 1, 2016 01:52 IST

‘रॉक आॅन २’ चे शूटिंग संपल्यावर श्रद्धा कपूर आता ‘बाघी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त झाली होती. यात तिच्याविरुद्ध टायगर श्रॉफ आहे. जशी तिने ‘बाघी’चे शूटिंग पूर्ण केले तसे तिला मोहित

‘रॉक आॅन २’ चे शूटिंग संपल्यावर श्रद्धा कपूर आता ‘बाघी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त झाली होती. यात तिच्याविरुद्ध टायगर श्रॉफ आहे. जशी तिने ‘बाघी’चे शूटिंग पूर्ण केले तसे तिला मोहित सुरी यांच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’साठी निमंत्रण आले. यात ती अर्जुन कपूरसोबत रोमान्स करताना दिसेल. श्रद्धाने नुकताच इन्स्ट्राग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात तिच्या उजव्या हाताला जखम झालेली दिसत आहे. तिला ‘बाघी’साठी शूटिंग करताना या हाताला जखम झाली आहे. वेल, श्रद्धा तू खूपच फास्ट काम करतेस हे आम्हाला कळतेय. पण स्वत:ला इजा होईल असे काही करू नकोस. लवकर रिकव्हर व्हावीस एवढीच प्रार्थना.