Join us
Daily Top 2Weekly Top 5

"नादखुळा पिच्चर आनून तू आम्हाला 'जन्नत' दाखव....", किरण मानेंनी किंग खानला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 14:01 IST

Kiran Mane : अभिनेता किरण माने यांनीदेखील शाहरुख खानचे फोटो शेअर करत वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख (Shah Rukh Khan) आज २ नोव्हेंबरला त्याचा ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे. मध्यरात्री शाहरुखच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देण्यासाठी मन्नत बंगल्याबाहेर गर्दी केली होती. शाहरुखनेही बाल्कनीत येऊन चाहत्यांना सरप्राइज दिले आणि त्यांचे आभार मानले. सोशल मीडियावरही कलाकार मंडळी बॉलिवूडच्या बादशाहावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांनीदेखील शाहरुख खानचे फोटो शेअर करत वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

किरण माने यांनी इंस्टाग्रामवर शाहरुख खानचे फोटो शेअर करत लिहिले की, शारख्या, त्यांना वाटलं सगळं जग आपल्या बापाचं हाय. आपन 'बायकाॅट' म्हन्लं की मानूस इंडस्ट्रीतनं आऊट ! आमच्या इरोधात बोलाल तर काम काढून घिवू. कोन पिच्चरला येनार नाय अशी व्यवस्था करू. 'हम करे सो कायदा' म्हनत त्यांनी गेमा करायला सुरूवात केली. कलाकारांमधली जी दोनचार टाळकी विरोधात बोलत होती, ती बी भेदरुन गप झाली. मग काय, बायकाॅट गॅंगला वाटलं 'साला आपुनईच भगवान है" !

ह्या गॅंगच्या तू कायम टारगेटवर होतास. तू पाकिस्तानधार्जिना आहेस असं खोटं पसरवलं. तुझ्या मुलाला खोट्या प्रकरनात अडकवलं गेलं तवा तर गॅंगनं हैदोस घातला. लतादिदींच्या पार्थिवाजवळ फुंकर मारल्यावर 'तू थुंकला' असा कांगावा करत धिंगाना घातला...लै मोठ्या गॅपनंतर तू आलास. नेहमीच्या स्वॅगमधी चालत... कापणारी नजर रोखत... केस उडवत. फूल्ल श्टाईल में ! बायकाॅट गॅंग चेकाळली. 'आता ह्याला रस्त्यावर आनूया, लै माज करतोय स्स्साला' म्हनत मोहिम सुरू केली. आल्याआल्या तू असा 'पठाण' लावला, का सात-आठशे करोड कमावल्याशिवाय काढलाच नाहीस. बायकाॅट गॅंग कळवळून बोंबलायला लागली. बाकी सगळं जग धुंद होऊन नाचत होतं "झुमे जो पठाण, मेरी जान, महफिल ही लूट जाये." कम्बख़्त कारस्थानी गॅंग धक्क्यातनं सावरेपर्यन्त 'जवान' लावलास... खाडकन मुस्काडात देत म्हन्लास, "बेटे को हाथ लगाने से पहले, बाप से बात कर".. परत हजार करोडचा दांडगा धुमाकूळ !  शारख्या, माणूस म्हनून तू लै लै लै ग्रेट हायेस. तुझं समाजभान, तुझी बुद्धीमत्ता, तुझं वाचन, तुझा सेन्स ऑफ ह्यूमर... आन् सगळ्यात महत्त्वाचं, जे मी लै 'रिलेट' करतो, तो म्हन्जे संकटावर उल्टी चाल करून जानं. निधड्या छातीनं.

ज्या काळात सत्ताधार्‍यांविरोधात एक शब्दबी उच्चारनं म्हन्जे काम हातातनं घालवनं... नायतर मागे ईडी लावुन घेनं... लैच झालं तर तुरूंगात जानं. त्या दहशतीच्या काळात तू थेट सिनेमातनं डंके की चोटपर भारतीय नागरीकांना सांगीतलंस, "जात-पात-धर्म-संप्रदाय के लिए व्होट देने के बजाय, जो आपसे व्होट माॅंगने आए, आप उससे सवाल पुछो ! पुछो उससे के अगले पाॅंच साल तक तुम मेरे लिए क्या करोगे? मेरे बच्चोंकी शिक्षा के लिए क्या करोगे? मुझे नौकरी देने के लिए क्या करोगे?? मै अगर बिमार पड गया तो मेरे परिवार के लिए क्या करोगे??? अगले पाॅंच साल तक तुम मेरे देश को आगे बढाने के लिए क्या करोगे... पुछो उससे." शारख्या, आज तुझा बड्डे ! लै लै लै जग. आम्हाला बख्खळ आनंद दे. प्रेरना दे. मनोरंजन, स्वॅग आनि समाजभान याचा काॅम्बो असलेला लाभावा ही आमची 'मन्नत' खुदानं पुरी केलेलीच हाय. असेच नादखुळा पिच्चर आनून तू आम्हाला 'जन्नत' दाखव. लब्यू शारख्या.

टॅग्स :शाहरुख खानकिरण माने