Join us

'रंग माझा वेगळा' मालिकेत धक्कादायक वळण, अखेर दीपिका समोर येणार 'ते' सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 15:36 IST

Rang Maza Vegla: रंग माझा वेगळा मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. एकीकडे नुकतेच कार्तिक दीपाला तो कधीच बाबा होऊ शकत नाही, हे सांगतो तर आता दुसरीकडे दीपिकाला ती अनाथ असल्याचे समजते आणि ती घर सोडून जाते. त्यामुळे पुढे काय घडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

रंग माझा वेगळा मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोत पाहायला मिळाले की, श्वेता फोनवर बोलत असते तेव्हा दीपिका ऐकते की ती दीपिका एकतर आहे बिचारी अनाथ. अनाथ ते अनाथच ना. ना तिचा डॅडा खरा बाप आहे आणि ना तिची ग्रॅण्ड माँ तिची आजी खरी आहे. शेवटी काय आहे ना दीपा अनाथ ते अनाथच ना. हे ऐकून दीपिकाला खूप धक्का बसतो आणि ती रडू लागते. आरशात स्वतःला पाहते आणि घरात कोणालाही काहीही न सांगता ती घराबाहेर पडते. त्यामुळे आता दीपिका कुठे जाते आणि पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

रंग माझा वेगळा मालिकेत नुकतेच दीपा श्वेताची प्रेग्नेंसीत काळजी घेण्यासाठी दररोज ईनामदारांच्या घरी येत आहे. त्यात होळीला ती आणि कार्तिकी तिथेच राहते. श्वेता दीपाच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिक्स करते,ज्यामुळे दीपा विचित्र वागू लागते. नंतर कार्तिकही ते मिक्स केलेले ड्रिंक पितो आणि तोही दीपासारखे वागू लागतो. दीपा कार्तिकच्या खोलीत असते तेव्हा तिथे कार्तिकही येतो. तेव्हा कार्तिक आणि दीपा त्यांचे एकमेकांवर किती प्रेम आहे सांगतात. तसेच कार्तिक कधीच बाबा होऊ शकत नाही हे सांगतो. हे सर्व कॅमेऱ्यात कैद होते आणि ते दोघे एकमेकांच्या जवळ झोपतात. जेव्हा दीपाला जाग येते तेव्हा तिला खूप वाईट वाटते आणि आयशा हे सर्व पाहते. तीदेखील दीपाला खूप सुनावते. त्यानंतर आता कार्तिक आणि दीपा एकत्र येणार का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :स्टार प्रवाह