Join us
Daily Top 2Weekly Top 5

या मराठी अभिनेत्रीच्या कातिलाना अदा पाहून व्हाल क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 17:01 IST

बॉलिवूडच्या कलाकारांप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील सोशल मीडियावर सक्रीय आहेत

बॉलिवूडच्या कलाकारांप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि तेदेखील सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असतात. अभिनेत्री शिवानी रांगोळेदेखील सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतेच तिने फोटोशूटचे फोटो शेअर करत आहेत. या फोटोंमध्ये ती खूप बोल्ड दिसते आहे.

शिवानी रांगोळे हिने नुकतेच फोटो शूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये शिवानी भलतीच हॉट दिसतेय. या फोटोंमध्ये तिचा घायाळ करणार अंदाज पाहायला मिळतोय. हॉट, गॉर्जिअस, कूल, स्टनिंग अशा कमेंटस आल्या आहेत. 

शिवानी रांगोळे हिने झी मराठी वाहिनीवरील शेजारी शेजारी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने महुआ हिची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती फुंतरू आणि अॅण्ड जरा हटके चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. स्टारप्रवाह वरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर'  या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे बाबासाहेबांच्या पत्नीची म्हणजेच रमाबाईंची भूमिका साकारते आहे.

टॅग्स :शिवानी रांगोळे