Join us  

Video: सही पकडे है! 'मुंबईत रिक्षाचालकांना भलताच अॅटिट्युड'; शिल्पा शिंदेचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 11:51 AM

'बिग बॉस ११' ची विजेती शिल्पा शिंदे हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shilpa Shinde Reel : 'बिग बॉस ११' ची विजेती शिल्पा शिंदे हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईच्या रिक्षाचालकांना किती अॅटिट्युड आहे याचा अनुभव प्रत्येकालाच आला असेल. यावरच शिल्पाने एक मजेदार रील बनवले आहे.

शिल्पा शिंदे स्वत: रिक्षात चालकाच्या सीटवर बसली आहे. नंतर एक मुलगी येते आणि तिला विचारते 'वसई चलोगे क्या?' त्यावर शिल्पा म्हणते, 'नही मेरेको नही जाना.' ती मुलगी विचारते 'क्यु नही जाना', शिल्पा म्हणते 'मुझे जहा जाना है वहा चलोगे' मुलगी म्हणते 'हा चलो,' त्यावर शिल्पा म्हणते 'नही जाना'. शेवटी शिल्पा वैतागुन म्हणते 'चल रे दिमाग का दही मत कर'

शिल्पाने हे रील बनवण्याचे कारण सांगितले आहे. मुंबईत अनेक रिक्षाचालक असंच बोलतात. त्यांचा हाच अॅटिट्युड असतो. मुंबईकर अक्षरश: वैतागतात. मुंबईकरांच्या जवळचा हा विषय कॉमेडी रुपात मांडल्याने शिल्पाचे रील व्हायरल झाले आहे. असेच आणखी व्हिडिओ बनवत राहा अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. 

शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है' मालिकेतुन घराघरात पोहोचली. यानंतर तिने 'बिग बॉ़स' मध्ये सहभाग घेतला आणि विजेतीही ठरली. नंतर झलक दिखला जा मध्येही ती दिसली. आता शिल्पा ६ वर्षांनंतर मालिकेत कमबॅक करत आहे. 'मैडम सर' मध्ये शिल्पा शिंदे कॉमेडी भुमिका करताना दिसणार आहे. 

टॅग्स :शिल्पा शिंदेसोशल मीडियाऑटो रिक्षाइन्स्टाग्राम