Join us
Daily Top 2Weekly Top 5

शालिन भनोटला मोठा धक्का! एक्स-वाईफ दलजीत कौरचा झाला साखरपुडा, मुलासह भारत सोडून जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 15:39 IST

शालीन भनोट 'बिग बॉस 16' मध्ये आहे आणि तो यापासून गाफील आहे. लवकरच त्याची एक्स वाईफ दुसरा संसार थाटणार आहे.

शालीन भनोट 'बिग बॉस 16' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यापासून चर्चेत आहे. शोमध्ये त्याला अनेकवेळा एक्स-वाईफ दिलजीत कौरचे नाव घेऊन अनेकदा लक्ष्य केलं. यावर त्याने आक्षेपही घेतला. दिलजीत मध्ये आणलं म्हणून    टीना दत्ता आणि अर्चना गौतम यांच्याशी भांडणही केले. पण आता तिच्यासाठी एक वाईट बातमी आहे की त्याची एक्स-वाईफ मुलाला घेऊन लंडनला जाणार आहे. 

खरंतर दलजीत कौर पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या निखिल पटेलसोबत तिचं एंगेजमेंट झालं आहे. दोघांनी ३ जानेवारीला नेपाळमध्ये एंगेजमेंट केली होती. आणि आता ती मार्चमध्ये निखिलशी लग्न करणार आहे. लग्नानंतर दलजीत कौर नैरोबी लंडनला शिफ्ट होणार आहे. ती आपल्यासोबत मुलाला ही घेऊन जाणार आहे. शालीन 'बिग बॉस 16' मध्ये आहे आणि तो यापासून गाफील आहे. निखिल एक फायनान्स कंपनी चालवतो. 

दलजीतने एका मीडियाशी तिच्या लग्नानंतरच्या प्लॅनिंगबद्दल सांगितले आहे. यादरम्यान अभिनेत्री म्हणाली, 'माझे लग्न मार्चमध्ये आहे आणि मी अजूनही अनेक गोष्टी शोधत आहे. लग्नानंतर काही वर्षांसाठी मी आफ्रिकेतील नैरोबीला जाईन कारण निखिलला कामासाठी तिथेच राहावे लागणार आहे. काम संपल्यानंतर आपण लंडनला परत जाऊ, जिथे त्याचे घर आहे. दलजीत आणि निक दोघांचे हे दुसरे लग्न आहे.

गेल्या वर्षी दुबईत मित्राच्या पार्टीत दलजीत पहिल्यांदा निकला भेटली होती. त्या काळात दोघेही फक्त मुलांबद्दल बोलायचे आणि कुणाच्याही मनात प्रेमाची भावना नव्हती. दोघेही काळाच्या ओघात प्रेमात पडले. जवळपास एक वर्ष निखिलसोबत रिलेशनशिपमध्ये दिलजीतने लग्नाचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीचे यापूर्वी शालीन भनोटसोबत लग्न झाले होते. 2009 मध्ये दोघांचे लग्न झाले होते, मात्र त्यानंतर लगेचच दलजीत आणि शालीन यांच्यात भांडणाच्या बातम्या येऊ लागल्या. हे भांडण इतके वाढले की अखेर 2013 मध्ये दोघांनी आपले मार्ग वेगळे केले.

 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार