Join us  

Bigg Boss 16 Promo : शालीनचा चक्क सलमानला टोमणा, भाईजानचा चढला पारा, बघा तरी नेमकं झालं काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 10:39 AM

Bigg Boss 16 Weekend Ka Vaar Promo : आजच्या वीकेंड का वारमध्ये सलमानच्या निशाण्यावर एक नाही तर तीन सदस्य असणार आहेत. शुक्रवारी दाखवल्या जाणाऱ्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे.

Bigg Boss 16 Weekend Ka Vaar Promo : ‘बिग बॉस 16’चा (Bigg Boss 16 ) फिनाले जसजसा जवळ येतोय, तसा शो आणखी रोमांचक होतोय. आजचा वीकेंडचा वार आणखीच जबरदस्त असणार आहे. होय, आजच्या वीकेंड का वारमध्ये सलमानच्या(Salman Khan) निशाण्यावर एक नाही तर तीन सदस्य असणार आहेत. शुक्रवारी दाखवल्या जाणाऱ्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. यात सलमान अर्चना गौतम, निम्रत कौर अहलुवालिया आणि शालीन भनोटचा (Shalin Bhanot) क्लास घेताना दिसतोय.

अचर्नाचं वागणं, घरातील तिची शिवीगाळ यासाठी सलमानने तिला चांगलंच सुनावलं. निम्रत सतत रडत असते. यासाठी सलमानने तिला फैलावर घेतलं. शालीनचं काय तर शालीनने स्वत:च सलमानशी पंगा घेतला. आता कशासाठी तर ते आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो.

तर त्याचं झालं असं की, भांडणात अर्चनाने शालीनची एक्स-वाईफ दलजीत कौर हिच्यावर कमेंट केली. यामुळे शालीनचा पारा चढला. अर्चनाने दुसऱ्यांदा दलजीतच्या नावावरून शालीनला डिवचलं होतं. त्यामुळे शालीन भडकला होता. अगदी यासाठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं तरी त्याला चालणार होतं. रागाच्या भरात तो अर्चनाला नको ते बोलून गेला.

आजच्या वीकेंड का वारमध्ये हा मुद्दा चर्चेत आला. शालीन इथेही भडकला आणि सलमानलाच अ‍ॅटिट्यूड दाखवू लागला. मग काय, सलमानही संतापला. प्रोमोमध्ये,सलमान शालीनला त्याची चूक सांगतो. शालीन तू एका मुलीला ‘2 टके की औरत’ म्हणालास..,असं सलमान म्हणाला. यावर शालीन बिथरला. ‘मी रागात म्हणालो आणि मी फक्त तिच्याबद्दल बोललो. ती तर माझ्या कुटुंबाबद्दल बोलली. एखादी व्यक्ती माझ्यासाठी खास असेल तर मी तिच्याबद्दल एक अक्षरही ऐकून घेणार नाही,’असं शालीन बोलला. यावर, अरे तू पूर्ण मुद्दाच मिस करतोय, असं सलमान त्याला समजावत असतानाच शालीन अचानक चिडला. त्याने चक्क सलमानलाच टोमणा हाणला. बसा चुपचाप आणि सगळं ऐकून घ्या..., असं शालीन म्हणाला. शालीनचं हे वागणं सलमानला खटकलं नसेल तर नवल. यापुढे काय झालं, ते आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. शालीनच्या टोमण्याला सलमान कसं उत्तर देतो, ते बघूच.

टॅग्स :बिग बॉससलमान खानटेलिव्हिजनकलर्स