बॉलीवूडमध्ये सध्या सिक्स पॅक्स, एट पॅक्स करण्याची जणू शर्यतच लागली आहे. आमीर, शाहरूख, सलमान, अक्षय, अजय यांच्यापाठोपाठ रणवीर आणि आता शाहीदही या स्पर्धेत उतरला आहे. रामलीला चित्रपटात फक्त धोती घालून सिक्स पॅक दाखवणाऱ्या रणवीरवर तमाम तरुणी घायाळ झाल्या. यालाच टफ फाइट की काय चॉकलेट बॉय शाहीद कपूरही दिवस-रात्र व्यायाम करीत आहे. तो आपले व्यायाम करतानाचे फोटो सोशल नेटवर्किंगवर गेले काही दिवस पोस्ट करीत आहे. ‘हैदर’फेम कलाकाराने नुकताच फक्त टॉवेल गुंडाळलेला फोटो ट्विटरवर प्रसिद्ध केला आहे. बॉडी बिल्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधण्याच्या या स्पर्धेत शाहीद किती पसंतीस उतरेल, ते येणारा काळच सांगेल.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}