Join us  

मोहनलालचा 'जिंदा बंदा' वरचा डान्स पाहून भारावला शाहरुख; किंग खानने दिलं थेट जेवणाचं आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 11:33 AM

Mohanlal: शाहरुखने मोहनलालचा डान्स व्हिडीओ शेअर केल्यानंतर मोहनलालनेही त्याला रिप्लाय दिला आहे.

अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) याचा जवान (jawan) हा सिनेमा २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून त्यातील गाणीही बरीच गाजली. विशेष म्हणजे या सिनेमातील 'जिंदा बंदा' या गाण्यावर दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल (mohanlal) याने जबरदस्त डान्स केला आहे. सध्या मोहनलालचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोचीमध्ये नुकताच एक पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात मल्याळम सुपरस्टार मोहनलाल याने जिंदा बंदा या गाण्यावर डान्स केला. मोहनलालचा हा डान्स व्हिडीओ शाहरुखने शेअर केला आहे. सोबतच त्याने मोहनलालचं कौतुकही केलं आहे.

"तुम्ही हे गाणं माझ्यासाठी आणखीनच खास केल्यामुळे मनापासून धन्यवाद मोहनलाल सर!.  आता हा व्हिडीओ पाहून मला असं वाटतंय की, मी तुमच्या इतकं चांगलं करु शकलो असतो तरी मला समाधान मिळालं असतं. माझं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे सर. तुम्ही माझ्या घरी जेवायला कधी येताय याची मी वाट पाहतोय. तुम्ही खरे जिंदा बंदा आहात", असं कॅप्शन देत शाहरुखने मोहनलाल यांचं कौतुक केलं आहे.

शाहरुखने हा व्हिडीओ त्याच्या अधिकृत X (ट्विटर) वर शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओर मोहनलालने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. "प्रिय, शाहरुख तुझ्यासारखा डान्स कोणीही करू शकत नाही. तू तुझ्या क्लासिक, अप्रतिम शैलीत खराखुरा ‘जिंदा बंदा’ आहेस आणि नेहमीच राहशील. तुझ्या या गोड शब्दांसाठी धन्यवाद! आणि फक्त जेवण का? नाश्ता करतानादेखील आपण ‘जिंदा बंदा’वर थिरकू शकतो,” असा रिप्लाय मोहनलाल यांनी दिला आहे.

दरम्यान, जवान हा सिनेमा २०२३ मध्ये रिलीज झाला. या सिनेमात त्याच्या सोब सान्या मल्होत्रा, प्रियामणी यांनी स्क्रीन शेअर केली आहे. २०१८ मध्ये द झिरोच्या अपयशानंतर शाहरुखने काही काळ ब्रेक घेतला होता. त्यानंतर २०२३ मध्ये त्याने दमदार कमबॅक केलं. एकाच वर्षात त्याचे पठाण, जवान आणि डंकी हे तीन सिनेमा रिलीज झाले.

टॅग्स :बॉलिवूडशाहरुख खानसेलिब्रिटीTollywood