Join us  

'किंग' मधील शाहरुख खानचा लूक लीक; सोशल मीडियावर सेटवरील फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 10:47 AM

किंग खान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. शाहरुखने आतापर्यंत अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. किंग खान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शाहरुखचा आगामी सिनेमा 'किंग' गेल्या बराच काळापासून चर्चेत आहे. बिग बजेट सिनेमासाठी शाहरुख खूप मेहनत घेतोय. शाहरुखचा सिनेमातील लूक रिव्हील होऊ नये म्हणून सुद्धा सेटवर खूप काळजी घेतली जातेय. तरीही शाहरुख खानचा सिनेमातील लूक लीक झाला आहे. हा लूक पाहून   आता प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.

सोशल मीडिया व्हायरल फोटोमध्ये शाहरुख डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे.  मीडिया रिपोर्टनुसार, फोटोतील शाहरुख खानचा लूक आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ब्लॅक शर्ट, त्यावर गॉगल या लूकमध्ये शाहरुख दिसतोय. त्याचा हा रफ अँड टफ लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत. सोशल मीडियावर त्याचा हा लूक चर्चेत आहे. हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, वर्ष २०२०३ हे शाहरुखसाठी खूप खास राहिलं. गेल्या वर्षात शाहरुन एकापाठोपाठ हीट चित्रपट देत बॉक्स ऑफिस गाजवलं. 2023 च्या सुरुवातीला शाहरुखच्या पठाण सिनेमानं धुमाकूळ घातला. त्यानंतर त्याचा जवान सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमानंदेखील रेकॉर्ड मोडले. वर्षाच्या अखेरीस त्याचा 'डंकी' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. एकूणच वर्ष २०२०३ शाहरुखसाठी ब्लॉकबस्टर ठरलं. आता चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

टॅग्स :शाहरुख खानसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमासोशल मीडिया