Join us
Daily Top 2Weekly Top 5

अथिया शेट्टी-केएल राहुलनंतर ‘चक दे इंडिया’मधील ‘ही' अभिनेत्री बांधणार लग्नगाठ; 11 वर्षांपासून करतेय अभिनेत्याला डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 11:13 IST

अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या ‘चक दे इंडिया’मधील अभिनेत्री लग्नगाठ बांधणार आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये इंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकानंतर एक सेलिब्रिटीलग्नबेडीत अडकत आहेत. अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नानंतर सिड-कियाराच्या लग्नाची धूम आहे. जैसलमेरमध्ये पॅलेसदेखील बूक करण्यात आला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीच्या लग्नावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्रीच्या लग्नाचा बातमी समोर येते आहे. आम्ही बोलतोय ते 'चक दे ​​इंडिया'च्या कोमल चौटाला उर्फ ​​चित्राशी रावतबद्दल.

कधी होणार लग्न रिपोर्टनुसार 'चक दे ​​इंडिया' फेम अभिनेत्री चित्राशी रावत लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. चित्राशी तिचा बॉयफ्रेंड ध्रुवदित्य भगवानानीसोबत ४ फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. चित्राशी आणि ध्रुवदित्य यांची भेट 'प्रेमामयी' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. जवळपास 11 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर  हे जोडपे छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये लग्न करणार आहेत.

'फॅशन', 'चक दे ​​इंडिया', 'तेरे नाल लव हो गया' यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या चित्राशी तिच्या लग्नाविषयी एका मीडिया हाऊसशी बोलताना म्हणाली, 'ध्रुव मूळचा रायपूर (छत्तीसगड)चा आहे आणि आम्ही बिलासपूरमध्ये लग्न करतो. आमचं लग्न दुपारी होईल.  

कोण आहे चित्राशीचा होणारा नवरा?चित्राशी रावत ध्रुवदित्य भगवानानीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. ध्रुवदित्य हा एक अभिनेता आहे ज्याने 'फ्लाइट', 'द ग्रे' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासोबतच तो हंगामा प्ले वेब सीरिज 'डॅमेज्ड'मध्येही काम करताना दिसला आहे.

टॅग्स :शाहरुख खानसेलिब्रिटीअथिया शेट्टी