Join us  

विवाहबाह्य संबंध नाही तर...'या' कारणामुळे झाला आमचा घटस्फोट, सीमा सजदेहने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 5:18 PM

दोघांचं नेमकं कुठे बिनसलं याचा खुलासा सीमा सजदेहने केला आहे. 

Sohail Khan-Seema Sajdeh Divorce: बॉलिवूडमध्येघटस्फोट होण्याचं प्रमाण गेल्या काही काळापासून खूपच वाढलंय. अनेक जोड्या लग्नाच्या कित्येक वर्षानंतर विभक्त होत आहेत. अरबाज खान-मलायका, हृतिक-सुझैन यांची नावं तर माहितच आहेत. शिवाय सलमानचा दुसरा भाऊ सोहेल खाननेही (Sohail Khan) पत्नी सीमा सजदेहपासून (Seema Sajdeh) घटस्फोट घेतला. सहसा घटस्फोटाचं कारण म्हणजे दोघांच्या आयुष्यात कोणा तिसऱ्याची एन्ट्री झाली की काय हे असतं. पण सोहेल खानच्या प्रकरणात तसं मुळीच नाही. मग दोघांचं नेमकं कुठे बिनसलं याचा खुलासा सीमा सजदेहने केला आहे. 

सीमा सजदेहने नुकतीच एका चॅनलला मुलाखत दिली. यावेळी ती घटस्फोटाचं कारण सांगत म्हणाली, "अनेकांना वाटतं की एक्सट्रा मॅरिटल अफेअरमुळेच आमचा घटस्फोट झाला. पण तसं नाहीये. जेव्हा तुम्ही लग्नात एकमेकांसोबत आनंदी नसता, तुमच्यात सतत भांडणंच होत असतात तेव्हा मुलांवर याचा खूप वाईट परिणाम होत असतो. यातून आपण आपल्या मुलांचं किती नुकसान करत असतो हे कळतच नाही. म्हणून मी आणि सोहेलने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट घेण्याच्या आधीपासूनच आम्ही एकत्र न राहता वेगवेगळे राहत होतो."

ती पुढे म्हणाली, "माझा मुलगा शाळेत होता जेव्हा आमच्यात भांडणं व्हायला लागली होती. नंतर तो कॉलेजमध्ये गेला आणि स्वत:हूनच म्हणाला की आता मी मोठा झालोय. तुम्ही ठरवा काय करायचं ते. हे ऐकताच मी घटस्फोटाचा निर्णय घेतला."

सोहेल खान आणि सीमा सजदेह 1998 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांना निर्वान हा २२ वर्षांचा मुलगा आहे. लग्नाच्या तब्बल २५ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. 

टॅग्स :सोहेल खानबॉलिवूडघटस्फोट