Join us  

'एक डान्सर, एक जोकर'; युजरची कमेंट पाहून भडकल्या ऐश्वर्या नारकर, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 4:16 PM

Aishwarya narkar: ऐश्वर्या यांनी सडेतोड उत्तर देत ट्रोलरची बोलती बंद केली आहे.

मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन कपल म्हणजे ऐश्वर्या नारकर (aishwarya narkar) आणि अविनाश नारकर (avinash narkar). गेल्या कित्येक वर्षांपासून ही जोडी मराठी प्रेक्षकांवर आणि कलाविश्वावर राज्य करत आहे. त्यामुळे आज त्यांचा मोठा चाहतावर्ग असल्याचा पाहायला मिळतो. ऐश्वर्या आणि अविनाश ही जोडी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. परंतु, ज्याप्रमाणे नेटकरी त्यांच्यावर प्रेम करतात. तसंच अनेकदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र, या ट्रोलर्सला ऐश्वर्या नारकर कायम सडेतोड उत्तर देत असतात.

 ऐश्वर्या आणि अविनाश हे दोघे अनेकदा एकमेकांसोबतचे डान्स व्हिडीओ वा काही मजेशीर रिल्स शेअर करतात. यात अलिकडेच ऐश्वर्या यांनी गुलाबी शरारा या ट्रेंडिंग गाण्यावर रिल शेअर केलं. यात त्यांच्यासोबत अविनाश नारकर यांनीही ठेका धरला होता. त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली. मात्र, एका नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं. या ट्रोलरलाही ऐश्वर्या नारकर यांनी त्याच्याच शब्दांत उत्तर दिलं आहे.

'एक डान्सर, एक जोकर' अशी कमेंट करत एका युजरने ऐश्वर्या-अविनाश यांना ट्रोल केलं. मात्र, ही कमेंट पाहून ऐश्वर्या यांनीही त्याला सडेतोड उत्तर दिलं. परीवर चांगले संस्कार करा प्लीज. कसं बोलायचं ते शिकवा, असं उत्तर ऐश्वर्या यांनी दिलं. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक ट्रेंडिंग गाण्यावर रिल्स केले आहेत.

'एक डान्सर, एक जोकर' अशी कमेंट करत एका युजरने ऐश्वर्या-अविनाश यांना ट्रोल केलं. मात्र, ही कमेंट पाहून ऐश्वर्या यांनीही त्याला सडेतोड उत्तर दिलं. परीवर चांगले संस्कार करा प्लीज. कसं बोलायचं ते शिकवा, असं उत्तर ऐश्वर्या यांनी दिलं.दरम्यान, सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक ट्रेंडिंग गाण्यावर रिल्स केले आहेत.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअविनाश नारकरटेलिव्हिजनसेलिब्रिटी