सारा अली खान सध्या ‘लव आज कल 2’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात सारा अभिनेता कार्तिक आर्यनसोबत ऑनस्क्रिन रोमान्स करताना दिसणार आहे. पण त्याआधी सारा व कार्तिकच्या ऑफस्क्रिन रोमान्सची चर्चाही जोरात आहे. शूटींगदरम्यान एकमेकांसोबत एन्जॉय करण्याची एकही संधी सारा व कार्तिकने सोडली नाही. शूटींग संपल्यावर तर कार्तिकच्या आठवणीने सारा व्याकूळ झाली. सोशल मीडियावर कार्तिकसोबतचा एक फोटो पोस्ट करून साराने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘माझी सतत काळजी घेण्यासाठी तुझे आभार. तुझ्यासोबत घेतलेली कॉफी, तुझ्यासोबत प्यालेला चहा...मला पुन्हा हे करायला आवडेल. मी तुला किती मिस करेल, याचा तुला अंदाजही नाही...,’ असे साराने लिहिले. या पोस्टमधून सारा सगळेच काही बोलली.
सारा अली खान कार्तिकच्या आठवणीने व्याकूळ; रणवीर सिंग म्हणाला, विसरू नकोस...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 13:14 IST
सारा अली खान सध्या ‘लव आज कल 2’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात सारा अभिनेता कार्तिक आर्यनसोबत ऑनस्क्रिन रोमान्स करताना दिसणार आहे. पण त्याआधी सारा व कार्तिकच्या ऑफस्क्रिन रोमान्सची चर्चाही जोरात आहे.
सारा अली खान कार्तिकच्या आठवणीने व्याकूळ; रणवीर सिंग म्हणाला, विसरू नकोस...!!
ठळक मुद्दे‘लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’मध्ये कार्तिक व सारा दोघेही आले होते आणि रणवीरने दोघांचीही भेट घडवून आणली होती.