Join us
Daily Top 2Weekly Top 5

संकर्षण कऱ्हाडेनं शेअर केला कतारमधला मजेशीर Video , तुम्ही नक्कीच पोट धरुन हसाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 19:01 IST

नुकतंच सकंर्षण हा कतारला गेला होता. तिथला एक मजेशीर व्हिडीओ त्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

आईस्क्रीम खायला कुणाला आवडत नाही? लहानांपासून मोठ्यांपर्यंत आईस्क्रिमचे अनेक दिवाने आहेत. कधीकधी आईस्क्रीमशी संबंधित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे खूपच मजेदार असतात. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे. जो मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याचा आहे. नुकतंच सकंर्षण हा कतारला गेला होता. तिथला एक मजेशीर व्हिडीओ त्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

संकर्षणचा हा  व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये संकर्षण कऱ्हाडे आईस्क्रीम घेण्यासाठी गेला होता, पण आईस्क्रीमवाला त्याच्यासोबत प्रँक करायला लागला. इतका मजेशीर आहे की, तो पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल. हा व्हिडीओ खुद्द संकर्षणने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. आईस्क्रीम घेताना संकर्षणची किती तारांबळ उडाल्याचे दिसून येते आहे. 

मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय आणि गुणी अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. त्याने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. संकर्षण सध्या नाटक , टीव्ही आणि सिनेमा अशा तिनही माध्यमांत मुशाफिरी करत आहे.  संकर्षण विविध माध्यमांत कार्यरत असला तरीही त्याने रंगभूमीची कास सोडली नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो कायम चाहत्यांसोबत आपले अनुभव शेअर करत असतो. संकर्षणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'तु म्हणशील तसं' तसेच स्पृहा जोशीबरोबरदेखील 'संकर्षण व्हाया स्पृहा' हा कवितांचा कार्यक्रम करताना दिसून येतो.  

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीकतार