Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजूबाबाचे पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या'.. रात्रभरच्या पार्टीने शेजारी त्रस्त

By admin | Updated: April 15, 2016 14:50 IST

तुरूंगातून नुकताच बाहेर पडलेल्या अभिनेता संजय दत्तने रात्रभर केलेल्या पार्टीमुळे त्याचे शेजारी भलतेच त्रासले आणि त्यांना पोलिसांना पाचारण करावे लागले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - सुमारे दोन महिन्याभरापूर्वी तुरूंगातून शिक्षा भोगून बाहेर पडलेला अभिनेता संजय दत्तने स्वातंत्र्याचा मनमुराद आनंद लुटण्यास सुरूवात केली असून नुकतीच त्याने पाली हिल येथील निवासस्थानी मित्रांसाठी पार्टी आयोजित केली होती. मात्र रात्रभर चाललेल्या या पार्टीमुळे त्याचे शेजारी प्रचंड वैतागले आणि त्यांनी पोलिसांनाच पाचारण केले. 
स्पॉटबॉय डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, संजय व मान्यताने नुकतीच त्यांच्या पाली हिल येथील इम्पेरियल हाईट्स येथील निवासस्थानी मित्र-मैत्रिणींना बोलावून पार्टी केली. मध्यरात्री अडीचपर्यंत त्याच्या घरी मोठ-मोठ्याने गाणी वाजत होती आणि सगळेच जण पार्टीत मग्न होते. मात्र रात्रभर सुरू असलेल्या त्यांच्या धिंगाण्यामुळे संजयचे शेजारी डॉ. छाया व अमिताव शुक्ला हे भलतेच वैतागले आणि त्यांनी पोलिसांना फोन करून तक्रार केली. अखेर पहाटे ४ च्या सुमारास पोलिस संजयच्या घरी पोहोचल्यानंतर ही पार्टी गुंडाळण्यात आली.
दरम्यान संजय तुरूंगात जाण्यापूर्वी अमिताव यांचे त्याच्याशी संबंध बिघडलेलेच होते आणि संजयच्या वर्तणुकीमुळे त्यांना अनेकदा मनस्तापही सहन करावा लागला होता, असेही या वृत्तात नमूद करण्यात आला आहे.