Join us

संजय दत्तचा मूड बिघडला! सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला धक्का दिला, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 16:27 IST

संजय दत्तचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात तो रागाच्या भरात एका चाहत्याला धक्का मारताना दिसतोय.

बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजे संजय दत्त हा लोकप्रिय अभिनेता. संजय दत्त यांचे 'वास्तव' असो किंवा 'खलनायक'. प्रत्येक सिनेमात त्यांनी विविध भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. संजूबाबा तसा बाहेर लोकांमध्ये कमी दिसतो. पण याआधी अनेक पार्टी, इव्हेंटमध्ये संजय दत्त वेगळ्याच मूडमध्ये बघायला मिळाला. कधी तो पापाराझींना प्रेमाने ओरडतो. कधी त्यांना दारु पाहिजे का? असंही गमतीत विचारतो. परंतु नुकताच संजय दत्तचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात तो त्याच्या फॅनला धक्का मारताना दिसला.

 

व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळतंय की, संजय दत्त एका पार्कींग लॉटमध्ये त्याच्या स्वॅगमध्ये चालताना दिसतो. तो फोटो काढण्याच्या मूडमध्ये नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तो पापाराझींशीही बोलला नाही. याच वेळी एअरपोर्टवरच्या या पार्किंग लॉटमध्ये एका उत्साही चाहत्याचा त्याला राग आला. तो चाहता संजूबाबाच्या जवळ येऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता. पण संजूबाबाने त्या फॅनला दूर ढकलताना दिसले. नंतर काय झालं कळत नाहीय, कारण बाबा नंतर गाडीत बसत निघून गेला. 

संजय दत्तचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केलीय. संजूबाबाच्या आगामी वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो रवीना टंडन, मिथुन चक्रवर्ती, सनी देओल आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबत 'बाप' सिनेमात दिसणार आहे. याशिवाय अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' या सिनेमात सुद्धा तो अभिनय करताना दिसणार आहे. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

टॅग्स :संजय दत्तबॉलिवूड