प्रसाद ओक (Prasad Oak) हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. प्रसादने मेहनतीच्या जोरावर कलाविश्वात नाव कमावले आहे. प्रसाद ओकने अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटात काम केले आहे. अभिनेता महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीत पाहायला मिळतो. नुकतेच प्रसाद ओकने या शोमधील विनोदवीर समीर चौघुलेचा सम्या सम्या मैफिलीत माझ्या कार्यक्रम पाहिला आणि त्यानंतर त्याने समीरचं कौतुक केलं आहे.
प्रसाद ओकने सम्या सम्या मैफिलीत माझ्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “सम्या सम्या मैफिलीत माझ्या” तुझेच मी गोडवे गात आहे..अजूनही वाटते मला की..अजूनही हास्य रात आहे..सम्या सम्या मैफिलीत माझ्या..सम्या तुला भेटतात ना रे ? चार्ली आणि पु लं ही एकाच वेळी पुन्हा पुन्हा खात्री होत जाते ते देतात तुला जादूची एक गोळी. समीर चौघुले या आमच्या मित्राचा “सम्या सम्या मैफिलीत माझ्या” हा कार्यक्रम… नव्हे हा चमत्कार… मी प्रत्यक्ष पाहिला… कणेकर, उपाध्ये यांच्या कार्यक्रमांनंतर कित्येक वर्षांनी मी थेट हा कार्यक्रम पाहिला आणि भारावून गेलो…
प्रसादने पुढे म्हटले की, समीरची मराठीवर असलेली पकड… स्वच्छ आणि शुद्ध विनोद निर्मितीचं त्याला असलेलं भान हे सगळं मी “हास्यजत्रेत” अनेकदा बोलतोच.. पण तिथे तो अनेक कलाकारांसोबत असतो.. आणि इथे तो “एकटा” असतो… पूर्ण वेळ.. २.३० तास… आणि २.३० तास हा एकटाच आहे हे आपल्याला कार्यक्रम संपल्यावरच कळतं…सध्या ७/७ ८/८ कलाकार असलेल्या नाटकांचा ट्रेंड असताना… “एकट्या”नी हे धाडस करणं खरच जिकीरीचं होतं… पण “सम्या” मुळे ते सहज साध्य झालं. सम्या तुला खूप खूप खूप प्रेम आणि कोटी कोटी कोटी शुभेच्छा…!!! हा कार्यक्रम बघाssssssच…!!! मुंबईतला पहिला शो १६ तारखेलाच आहे… आणि तो अॅडव्हान्समध्येच हाउसफुल झाला आहे…!!!! पण पुढच्या शोजच्या जाहिराती येत राहतील..!!! मंजिरी ओक. प्रसाद ओक