‘संमोहनम’ या चित्रपटाचा अभिनेता अमित पुरोहित याचे अकाली निधन झाले. त्याच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. अमित हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक मोठे नाव होते. 2018 मध्ये आलेल्या ‘संमोहनम’ या चित्रपटात त्याने बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी हिच्या अपोझिट भूमिका साकारली होती. या चित्रपटात अमितने अदितीच्या एक्स- बॉयफ्रेन्डची भूमिका साकारली होती. अमितच्या अकाली निधनावर साऊथ फिल्म इंडस्ट्रीने शोक व्यक्त केला आहे.
‘बागी’ चित्रपटातील अभिनेता सुधीर बाबूने सोशल मीडियावर अमितच्या निधनाची बातमी शेअर केली. ‘संमोहनम’ चित्रपटात सुधीर बाबू लीड रोलमध्ये होता. सुधीर बाबूने टिष्ट्वटरवर लिहिले की, अमित पुरोहितच्या निधनाने मी स्तब्ध आहे. अमित एक अतिशय हरहुन्नरी व मनमिळावू अभिनेता होता. प्रत्येक शॉटसाठी तो जीवतोड मेहनत करायचा. परमेश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो.’
‘संमोहनम’चे दिग्दर्शक मोहनकृष्ण इंद्रगती यांनीही अमितला श्रद्धांजली अर्पण केली. अमितने पंख, बिजुका, आलाप आदी चित्रपटात काम केले होते.