Join us  

लग्नाच्या १ वर्षातच मोडला संसार, मग पहिल्याच नजरेत या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात पडला अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 11:50 AM

१९९६मध्ये त्याने लग्नगाठ बांधली पण हे लग्न फारकाळ टिकलं नाही, लग्नाच्या अवघ्या ६ महिन्यात दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.

चित्रपट असो किंवा वेबसिरीज, समीर सोनीने आपले अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हा अभिनेता बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. 'समुंदर' या टीव्ही मालिकेतून अभिनयाच्या जगात एंट्री घेणार हा अभिनेता आज 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. 1998 मध्ये आलेल्या 'चायना गेट' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या समीर सोनीचा जन्म लंडनमध्ये झाला होता. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, समीर सोनीने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणूनही काम केले होते. मात्र अभिनयाची आवड त्याला स्वस्थ बसू दते नव्हती बँकरची नोकरी सोडून तो मुंबईला परतला. समीर सोनीच्या चित्रपटांविषयी अनेकांना माहिती असेल पण त्याच्या  वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी जणांना माहिती असेल. 

समीर सोनीचे लग्न १९९६मध्ये  राजलक्ष्मी खानवलकरसोबत झालं होतं. पण हे लग्न फारकाळ टिकलं नाही, लग्नाच्या अवघ्या ६ महिन्यात दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. 1997 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला आणि दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे  निघून गेले.

पहिलं लग्न मोडल्यानंतर समीरच्या आयुष्यात अभिनेत्री नफिसा जोसेफची एंट्री झाली. मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. दोघांनी साखरपुडा केला. पण यावेळी अभिनेत्याला लग्नाबाबत कोणतीच घाई करायची नव्हती. पण हे नातं लग्नपर्यंत पोहोचूदेखील शकलं नाही. दोन वर्षानंतर त्यांचा साखरपुडा मोडला. 

2008 मध्ये समीर सोनीची भेट बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नीलम कोठारीशी झाली. पहिल्याच नजरेत समीर नीलमच्या प्रेमात पडला.  या जोडप्याला एकत्र आणण्यात टीव्ही क्वीनचा मोठा वाटा आहे. नीलम आणि समीर यांची पहिली भेट एकता कपूरच्या पार्टीत झाली होती. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर 2011 मध्ये दोघांनी लग्न केले. या जोडप्याने एका मुलीला दत्तक घेतले आणि आता ते सुखी कौटुंबिक जीवन जगत आहेत.

टॅग्स :समीर सोनी