Join us  

अश्वामीला लॉंच करणार सलमान! ‘दबंग-३’ ची चर्चा  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 10:44 AM

सुपरस्टार सलमान खानने अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर आणि शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत रोमान्स केला आहे. २०१० मध्ये सोनाक्षीने सलमानच्या ‘दबंग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती.

मुंबई : सुपरस्टार सलमान खानने अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर आणि शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत रोमान्स केला आहे. २०१० मध्ये सोनाक्षीने सलमानच्या ‘दबंग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. आता आठ वर्षांनंतर सलमान पुन्हा एकदा असेच काहीसे करताना दिसणार आहे. होय, सलमान आणखी एका न्यू कमरसाठी गॉडफादर बनणार आहे.

एका रिपोर्टनुसार, ‘दबंग-३’ मधून सलमान खान त्याचा मित्र महेश मांजरेकरची मुलगी अश्वामी मांजरेकर हिला लॉन्च करणार आहे. निर्मात्यांना सोनाक्षीसोबत या हिट सीरिजमध्ये आणखी एक अभिनेत्री हवी आहे. सुरुवातीला अशा बातम्या समोर आल्या होत्या की, सलमान या चित्रपटात मौनी रॉयला ब्रेक देणार आहे. परंतु एका मुलाखतीत मौनीने स्पष्ट केले होते की, ती ‘दबंग-३’मध्ये नसणार आहे.

लेटेस्ट अपडेटनुसार, अश्वामी या चित्रपटाचा भाग बनणार आहे. दरम्यान, ही बाब फारच कमी लोकांना माहिती आहे की, महेश आणि सलमान एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. अशात जेव्हा सलमानला कळाले की, महेशची मुलगी बॉलिवूडमध्ये काम करू इच्छिते तेव्हा त्याने लगेचच तिला ‘दबंग-३’मध्ये भूमिका देण्याविषयी योजना आखली आहे.