बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याच्या ‘दबंग 3’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. ‘दबंग’ सीरिजच्या आधीच्या दोन चित्रपटांप्रमाणे या चित्रपटातही सलमान चुलबुल पांडेचे आयकॉनिक कॅरेक्टर साकारताना दिसणार आहे. काल या चित्रपटाचा ट्रेलर झाला. 3 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अॅक्शनसोबत कॉमेडीही दिसली. सोबत एक चूकही. होय, या ट्रेलरमधील एक मोठी चूक अनेकांनी हेरली. काळजीपूर्वक बघितल्यास तुम्हालाही ती दिसेल.
‘दबंग 3’बाबतचे सर्व रचनात्मक निर्णय सलमानने घेतले. पण एक गोष्ट मात्र सलमानच्या नजरेतून नेमकी सुटली. होय, ‘दबंग 3’ येत्या 20 डिसेंबरला प्रदर्शित होतोय. पण ट्रेलरच्या शेवटी डिसेंबरचे स्पेलिंग लिहिताना गल्लत झाली आहे. सुरुवातीला डिसेंबरचे स्पेलिंग बरोबर आहे. पण दुसºयांदा रिलीज डेटमध्ये डिसेंबरचे स्पेलिंग Decemeber असे लिहिले गेले आहे. आता सलमान ही चूक किती लवकरच सुधारतो, तेच बघायचेय.