सलमान खान आणि कतरीना कैफ स्टारर ‘भारत’ या चित्रपटाच्या ट्रेलरकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या असताना काही क्षणांपूर्वी सलमानने या चित्रपटातील स्वत:चा लूक शेअर केला. सलमान खान या चित्रपटात वेगवेगळ्या सहा अवतारात दिसणार आहे. साहजिकच चाहते उत्सुक आहे. सलमानने शेअर केलेला ताजा लूक पाहून चाहत्यांची ही उत्सुकता शिगेला पोहोचेल हे नक्की.
या फोटोत सलमान खान एका आगळ्यावेगळ्या रूपात दिसतोय. पांढरे केस, पांढरी दाढी असे त्याचे हे लूक आहे. ‘जितने सफेद बाल मेरे सर और दाढी में है, उससे कहीं ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रहीं है,’ असे हा लूक शेअर करताना सलमानने लिहिले आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंतची कथा सलमानच्या या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. भारताच्या पूर्वजांनी कुठल्या प्रकारच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले होते आणि आजचा भारत कसा आहे,अशी या चित्रपटाची ढोबळ कथा आहे. येत्या २४ तारखेला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होतोय.
दिग्दर्शक अली अब्बास जफरने उत्तर भारताच्या विविध ठिकाणी या चित्रपटाचे शूटींग केली. हे लोकेशन्स निवडण्यासाठी ‘भारत’च्या टीमने अख्खा उत्तर भारत पालथा घातला होता. या चित्रपटात भाईजान सलमान खानसोबत कतरीना कैफ, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर, तब्बू, दिशा पाटनी असे अनेक कलाकार आहेत. ईदच्या मुहूर्तावर ‘भारत’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. मेकर्सना हा सिनेमा लिमिटेड ऑडियन्सपर्यंत मर्यादित ठेवायचा नसल्यामुळे भारताला अन्य भाषांमध्ये सुद्धा रिलीज करण्यात येणार आहे.