संघर्ष हा कुणालाचं चुकत नसतो. प्रत्येकला आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तो करावाच लागतो. असाच संघर्ष सलमान खानच्या 'भारत' सिनेमातील अभिनेता देखील करतोय. भारत आणि क्राईम वेबसिरीजमध्ये काम केलेला चेतन राव सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मुळाचा दिल्लीचा असलेला चेतन आपलं अभिनयातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आला. मुंबईत तो स्ट्रगल करतोय. मुंबईत जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो म्हणून चेतन अभिनयाबरोबरच घरोघरी जावून जेवणाचे डबे पोहोचवण्याचं कामदेखील करतो.
चेतन सुरुवातीच्या काळात सेटवर स्पॉट बॉयचे कामं करायचा. तिथे त्याला अभिनयाबाबत बरंच काही शिकायला मिळालं. त्यानंतर तो क्राईम पेट्रोल सारख्या क्राईम शोमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका करायला लागला.
टाईम्स नाउच्या रिपोर्टनुसार, चेतनने सांगितले की, सुरुवातीला त्याला 2-3 मिनिटांच्या भूमिका मिळायच्या. मी प्रत्येक भूमिकेसाठी उत्सुक असायचो. आता मला सहजपणे छोट्या-मोठ्या भूमिका मिळतात.2 9 वर्षीय चेतन दिल्लीच्या कल्याणपूर परिसरात रहातो. त्याला फिल्म इंस्टिट्यूटमध्ये अभिनयाचं शिक्षण घ्यायचं होतं पण आर्थिक अडचणीमुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. त्यानंतर त्याने टिव्ही बघून अभिनय शिकायचं ठरवलं. जेवण्याचे डबे पोहोचवताना कधी कधी लोक मला ओळखतात तर कधी नाही ओळखतं. चेतनने सांगितले जेव्हा लोक मला ओळखतात तेव्हा मला चांगलं वाटते. तुम्हाला टिव्हीवर बघितलंय असे सांगितले की जास्त आनंद होतो असे देखील तो म्हणाला.
सलमान खानच्या भारतमध्ये छोटीशी भूमिका साकारलेल्या चेतनचे ध्येय स्पष्ट आहे. त्याला माहिती आहे की त्याला काय करायचं आहे. चेतन म्हणाला, मी आज एक डिलेव्हरी बॉय म्हणून काम करतोय मात्र एकेदिवशी मेहनत करुन सुपरस्टार नक्कीच होऊन.