सलमान खानने ‘दबंग 3’चे शूटींग सुरु केले नि भाईजानचे चाहते अक्षरश: ‘सैराट’ झालेत. आपला चुलबुल पांडे परततोय म्हटल्यावर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. मग काय,‘दबंग 3’च्या सेटवरचे एकापाठोपाठ एक अनेक फोटो लीक होणे सुरु झाले.काल ‘दबंग 3’च्या शूटींगचा पहिला दिवस होता. खुद्द सलमानने ‘दबंग 3’चे शूटींग सुरु झाल्याची गोड बातमी शेअर करत, स्वत:चा ‘हुड हुड दबंग स्टाईल’ फोटोही शेअर केला होता. सलमानने ही बातमी दिली आणि चाहत्यांचा उत्साह ओसंडून वाहू लागला. यानंतर ‘दबंग 3’च्या सेटवरचे फोटो शेअर करण्याचा धडाका सुरु झाला. केवळ इतकेच नाही तर ‘दबंग 3’चा सेट कसा झाला, कसा सजला म्हणजे, शूटींग सुरु होण्याचे फोटोही चाहत्यांनी शेअर केलेत.
हुड हुड दबंग...दबंग...दबंग...! भाईजानचे चाहते झालेत क्रेजी, सेटवरचे फोटो व्हायरल!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 10:49 IST
सलमान खानने ‘दबंग 3’चे शूटींग सुरु केले नि भाईजानचे चाहते अक्षरश: ‘सैराट’ झालेत. आपला चुलबुल पांडे परततोय म्हटल्यावर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. मग काय,‘दबंग 3’च्या सेटवरचे एकापाठोपाठ एक अनेक फोटो लीक होणे सुरु झाले.
हुड हुड दबंग...दबंग...दबंग...! भाईजानचे चाहते झालेत क्रेजी, सेटवरचे फोटो व्हायरल!!
ठळक मुद्दे लवकरच सलमानचा ‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘भारत’ हातावेगळा केल्यावर सलमानने ‘दबंग 3’चे शूटींग सुरु केले. ‘दबंग 3’ पूर्ण होताच सलमान ‘इंशाअल्लाह’ या संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात बिझी होणार आहे.