Join us

मुहूर्त ठरला, तर 'या' तारखेला सुरु होणार भाईजानच्या 'दबंग3' चे शूटिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 13:38 IST

सलमान खानने नुकतीच भारत सिनेमाची शूटिंग संपवली आहे. यानंतर तो आगामी सिनेमा 'दबंग3' च्या शूटिंगमध्ये बिझी होणार आहे.

ठळक मुद्दे गेल्या अनेक दिवसांपासून 'दबंग3' वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे हा सिनेमा याचवर्षी डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

सलमान खानने नुकतीच भारत सिनेमाची शूटिंग संपवली आहे. यानंतर तो आगामी सिनेमा 'दबंग3' च्या शूटिंगमध्ये बिझी होणार आहे, लवकरच सलमान या सिनेमाची शूटिंग सुरु करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 'दबंग3' वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. 

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्यादबंग 3 चे शूटिंग 1 एप्रिलपासून सुरु होणार आहे.तसेच हा सिनेमा याचवर्षी डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सलमानच्या अपोझिट सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे. ‘दबंग 3’मध्ये बॉबी सलमानच्या मित्राची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर कन्नड स्टार किच्चा सुदीप हा ‘दबंग 3’मध्ये व्हिलेनच्या भूमिकेत दिसेल. प्रभूदेवा या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. तर मलायका आणि अरबाज खानचा मुलगा अरहान प्रभूदेवाला असिस्ट करणार आहे. अरहान 'दबंग3' मधून सहायक दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवतोय.

२०१० मध्ये ‘दबंग’ प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१२ मध्ये ‘दबंग 2’ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. सलमान व सोनाक्षीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. गतवर्षी ‘दबंग’ला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग 3’ची घोषणा केली होती

टॅग्स :सलमान खानसोनाक्षी सिन्हादबंग 3