Join us

सलमान खानच्या 'दबंग 3' चे तुम्ही फॅन आहात, मग ही बातमी वाचाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 15:14 IST

सलमान खानच्या दबंग 3ची वाट फॅन्स मोठ्या आतुरतेने बघतायेत. वेगवेगळ्या कारणांमुळे हा सिनेमा चर्चेत आहे

सलमान खानच्यादबंग 3ची वाट फॅन्स मोठ्या आतुरतेने बघतायेत. वेगवेगळ्या कारणांमुळे हा सिनेमा चर्चेत आहे. सलमानने ट्वीट करुन फॅन्सना ईदच्या मुहूर्तावर गिफ्ट देण्याचा कबुल केले होते. आजतकच्या रिपोर्टनुसार सलमान खानचा दबंग 2020च्या ईदला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्या अपोझिट सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे.         

रिपोर्टनुसार सिनेमा 20 डिसेंबर 2019ला रिलीज होण्यासाठी तयार आहे. मात्र सलमानचे प्रोडक्शन 'दबंग3' ला 2020 च्या ईदच्या मुहूर्तावर रिलीज करण्याचा विचार करतो आहे. याबाबत दिग्दर्शक प्रभु देवालासुद्धा गंभीरतेने विचार करण्यास सांगितला आहे. हा सिनेमा हिंदीसोबतच कन्नड, तमीळ आणि तेलुगू भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल सलमानच्या फॅन्सना प्रचंड उत्सुकता आहे. 

मात्र 'किक 2'चे निर्माते- दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की किक 2 पुढच्या वर्षी ईदला रिलीज होणार आहे.  

'दबंग 3’ या चित्रपटातील पोलिस ऑफिसर चुलबुल पांडे प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. पोलिस ऑफिसर बनण्यापूर्वी चुलबुल कसा होता हे प्रेक्षकांना  ‘दबंग 3’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात चुलबुल पांडेचे वय ‘दबंग’ आणि ‘दबंग 2’ या दोन्ही चित्रपटांपेक्षा कमी असल्याने सलमान सध्या या चित्रपटासाठी वजन कमी करत आहे.

टॅग्स :सलमान खानदबंग 3