सलमान खानची बहीण अर्पिता ही दिल्लीच्या आयुष शर्मासोबत लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. आपल्या बहिणीला शानदार गिफ्ट देण्याची तयारी सलमान करीत आहे. तीन बेडरूम टेरेसचा फ्लॅट बहिणीला गिफ्ट म्हणून देण्याचा सलमानचा विचार आहे. गुंतवणुकीच्या हेतूने सलमानने पूर्वी हा फ्लॅट खरेदी केला होता; परंतु आता तो बहिणीला गिफ्ट म्हणून देण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. या नवीन फ्लॅटच्या अंतर्गत सजावटीचे काम सध्या सुरू असून, लग्नानंतर लगेचच अर्पिता आपला संसार सुरू करू शकेल, अशा वेगाने त्याची सजावट केली जात आहे. लग्नानंतर अर्पिताच्या मुंबई- दिल्लीच्या चकरा कायम राहतील. अरबाज आणि सोहेल या आपल्या भावांना लग्नाची भेट म्हणून सलमानने फ्लॅटच दिले होते, हे विशेष.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}