Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान-कॅटरिनामध्ये पुन्हा गुटरगुँ?

By admin | Updated: June 5, 2017 02:32 IST

सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ नेहमीच बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय राहिले आहेत

सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ नेहमीच बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय राहिले आहेत. एक काळ असा होता की, हे दोघेही त्यांच्यातील प्रेमप्रकरणामुळे चर्चेत असायचे. मात्र, त्यांच्यात ब्रेकअप झाल्याने या लव्हबर्ड्सनी काहीकाळ एकमेकांपासून दुरावा निर्माण केला होता. परंतु आता हे दोघे पुन्हा एकदा एकमेकांशी जवळीकता साधत असून, त्यांच्यातील प्रेमकथा नव्याने तर रंगत नाही ना? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. सलमान आणि कॅटरिनाच्या मनात अजूनही एकमेकांप्रती प्रेमांकुर फुलत असल्याची झलक तेव्हा बघावयास मिळाली. जेव्हा हे दोघे ‘आयफा-२०१७’ च्या एका इव्हेंटदरम्यान एकत्र आले होते. जेव्हा हे दोघे अभिनेत्री आलिया भट्ट हिच्याबरोबर आयफाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पोहोचले तेव्हा त्यांच्यातील ट्यूनिंग बघण्यासारखी होती. हे दोघे कधीकाळी एकमेकांपासून दूर झाले होते, असे यांच्याकडे बघून अजिबातच वाटत नव्हते. दोघांमधील केमिस्ट्री पाहता हे दोघे एकमेकांसाठीच बनलेले असावेत, असे जाणवत होते.